India's Hospitality Wins Foreign Vlogger's Heart During No Money Challenge in Amritsa ( अमृतसरमध्ये 'नो मनी चॅलेंज' दरम्यान भारताच्या आदरातिथ्याने परदेशी व्लॉगरचे मन जिंकले )
त्यांने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामआयडीवर शेअर केला आहे. हा व्लॉगर सुवर्ण मंदिराच्या आसपासच्या रस्त्यांवर फिरत होता. तो एका दुकानाजवळ पोहोचला आणि त्याने पाण्याची बाटली मागितली. दुकानदाराने त्याला सांगितले की या बाटलीची किंमत 20 रुपये आहे. परदेशी व्यक्ती म्हणाला की त्याच्याकडे फक्त 10 रुपये आहेत. दुकानदाराने हसून त्याला बाटली विनामूल्य दिली आणि म्हणाला, “ही आमच्याकडून आहे,” म्हणजेच भारताकडून, हे ऐकून व्लॉगरला खूप आनंद झाला.
पर्यटकाचे ‘नो मनी चॅलेंज’ संभाषण पुढे सरकल्यावर, व्लॉगरने स्पष्ट केले की तो ‘नो मनी चॅलेंज’वर आहे. त्याला पुढचे 24 तास पैशांशिवाय काढावे लागणार आहेत आणि तो सध्या सुवर्ण मंदिरात राहत आहे. त्या व्लॉगरला सुरुवातीला वाटले की पैशांशिवाय कोणीही त्याला काही देणार नाही. पण दुकानदाराने लगेच म्हटले, “काही हरकत नाही. तुम्ही इथे जेवू शकता, आणि बाहेर आल्यावर आमच्याकडे चहा घ्या.” या कृतीने त्या परदेशी व्यक्तीचे मन जिंकले.
त्याला जाणवले की भारत केवळ व्यवसायापुरता मर्यादित नाही, तर तो माणुसकीचाही देश आहे. दुकानदाराच्या वागण्याने हे सिद्ध झाले की भारतात पाहुणा हा केवळ ग्राहक नसून एक पाहुणचार्य असतो. पाण्याची बाटली मोफत देणे आणि त्याला चहासाठी आमंत्रित करणे ही गोष्ट लहान वाटू शकते, पण त्या परदेशी व्यक्तीसाठी तो एक महत्त्वपूर्ण अनुभव ठरला. तो म्हणाला की हाच खरा भारत आहे, जिथे मनापासून मदत केली जाते.
या व्हिडिओत “भारताची खरी बाजू” या कॅप्शनसह इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 16 लाखापेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तसेच त्याला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक भावूक झालेत. युझर्स दुकानदाराच्या इंग्रजी भाषेचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत.
एका युझर्स लिहिले आहे की, “भावाचा आत्मविश्वास चांगला आहे, आणि त्याचे इंग्रजी त्याहूनही चांगले आहे.” दुसऱ्याने लिहले आहे की, जेव्हा एखादा दुकानदार ‘आम्ही’ म्हणतो, तेव्हा तो केवळ स्वतःबद्दलच नाही, तर संपूर्ण देशाबद्दल बोलत असतो. अनेकांनी लिहिले की असे दुकानदार देशाची ओळख अधिक उज्वल करतात.
काहींनी म्हटले की, जर परदेशी लोकांनी केवळ सण आणि पर्यटन स्थळेच नव्हे, तर सामान्य लोकांचे जीवनही पाहिले, तर त्यांना भारताचे खरे चित्र समजेल. दुकानदाराचे इंग्रजी देखील चर्चेत आहे. परदेशी लोकांशी त्याचा न डगमगता केलेला संवाद आणि त्यांना केलेली मदत, ही तरुण पिढीसाठी एक आदर्श ठरली आहे.
‘नो मनी चॅलेंज’ हा अनेक परदेशी व्लॉगर्सचा आवडता विषय आहे. ते वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. तिथे गेल्यानंतर पैशांशिवाय जीवन जगण्याचे त्यांचे अनुभव सांगतात. हे चॅलेंज भारतात मोठ्या प्रमाणात केले जाते. हे चॅलेंज खास करून विदेशी पर्यटक करत असतात. कारण देशाचे आदरातिथ्य जगभरात प्रसिद्ध आहे. सुवर्ण मंदिरातील लंगरमध्ये आधीच मोफत भोजन दिले जाते, पण एका सामान्य दुकानदाराची ही वृत्ती त्याहूनही विशेष वाटतो.






