संग्रहित फोटो
राजकिरण तायडे हे बजाज कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची ड्युटी संपल्यानंतर ते सायकलने घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, कंपनीची बस (एमएच-२०-जीझेड-५४१८) चालकाने निष्काळजीपणे वळविल्याने बसची तायडे यांच्या सायकलला जोरदार धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आणि संबंधितांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई येथे असलेले त्यांचे लहान भाऊ उमेश तायडे (वय ३२) छत्रपती संभाजीनगर येथे आले. त्यांनी नातेवाइकांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर शनिवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या अपघाताची पुढील चौकशी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.
PMPML बसने अज्ञात व्यक्तीला चिरडले
पुण्यात पीएमपीएल बसने एका व्यक्तीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्वेनगर पुलाखाली बस चिरडण्याचा या घटनेत अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कर्वेनगर परिसरातून पायी जात असताना भरधाव पीएमपीएमएल बसने संबंधित पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. बसखाली आल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून,पुढील तपास सुरू केला आहे.
Ans: राजकिरण साहेबराव तायडे (वय ४०) असे मृत सुपरवायझरचे नाव आहे. ते बजाज कंपनीत कार्यरत होते.
Ans: २० नोव्हेंबर रोजी एमआयडीसी वाळूज परिसरात ड्युटी संपवून सायकलने घरी जात असताना कंपनीच्या बसने त्यांच्या सायकलला धडक दिली.
Ans: मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.






