भटक्या कुत्र्यांचा कहर! ७ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केला अन्...; पुढं जे घडलं थरारक, Video viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की पाहून हसू आवरणे कठीण होऊन जाते. तर काही व्हिडिओ इतरे भयावह असतात की कोणाचाही थरकाप उडले. सध्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दिल्लीपासून ते मथूपर्यंत अनेक राज्यांमध्ये, शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.
यावरुन काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये मोठा वादही सुरु होता. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे रेबिज होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत होत्या. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओतील घटना मथूरामध्ये घडली असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली पळताना दिसत आहे. तिच्यामागे तीन कुत्री देखील पळताना दिसत आहे. कुत्री तिच्यावर भुंकत असून चिमुकलली घाबरुन पळत आहे. मोठ्या मोठ्याने भितीने जीववाचवण्यासाठी मदत मागत आहे.
एका ठिकाणी चिमुकली पळत असताना पडते. यावेळी तीन्ही कुत्री तिच्यावर हल्ला करतात. तिच्या पायाला चावा घेतात. एक कुत्र्या तिची केस ओढण्याचा प्रयत्न करत. मुलगी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. मोठ्यामने ओरडून आईला मदत मागत असते. याच वेळी दुसऱ्या बाजून एक मुलगा काठी घेऊन पळत येतो. मुलगा कुत्र्यांना काठीने मारुन तिथून पळवून लावतो आणि मुलीचे प्राण वाचतात. पण थोडा जरी वेळ गेला असता, आसपास कोणी नसते तर चिमुलीला गंभीर दुखापत झाली असती.
आईचे धाडस पाहून सिंहीणीलाही घ्यावी लागल माघार; जिराफने असा केला बाळाचा बचाव, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
7 yo Kid, Shrishti attacked by group of stray dogs in Mathura
https://t.co/pKZznUobbz— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 30, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. अनेकांनी यावर चिमुकलीच्या प्रकृतीबद्दल विचारले आहे. यापूर्वी देखील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे अनेक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांनी भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Reel साठी वाट्टेल ते! धावत्या ट्रेनसमोर पुलावरून तरुणांनी मारली उडी; भयानक, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.