आईचं धाडस पाहून सिंहीणीलाही घ्यावी लागल माघार; जिराफने असा केला बाळाचा बचाव, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांचे देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. पाळीव प्राण्यांशिवाय, यामध्ये तुम्ही जगंलातील थरारक दृश्यांचे व्हिडिओही पाहिले असतील. प्राण्यांचे जीवनही अगदी मानवाप्रमाणेच आहे. येथेही कधी कोणी घात करेल, हल्ला करेल सांगता येत नाही. मानवाप्रमाणेच जगण्यासाठी प्राण्यांनाही संघर्ष करावा लागतो.
सध्या असाच एका संघर्षाच्या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका आईच्या संघर्षाची गोष्टी पाहायला मिळत आहे. जसे आपली आई आपल्यासाठी कोणत्याही संकटात ढाल बनून उभी राहते, तशीच बाळ जिराफाची आई त्याच्यासाठी उभी राहिली आहे. घडलं असे की एका सिंहणींनी एका जिराफला आणि तिच्या बाळाला एकटे पाहिले. यावेळी सिंहीणीने जिराफच्या बाळावर तिचे लक्ष नसताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण जिराफला हे लक्षात येतान, त्या आईने सिंहीणीला तिथून पळून लावले.
तुम्ही पाहू शकता की, सिंहणी हळूहळू तिच्या शिकारकडे म्हणजेच जिराफच्या बाळवर हल्ला करायला जाते. पण याच वेळी जिराफच्या लक्षात येताच ती सिंहणीला पायाने मारते, आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते. सिंहीणी दोन-तीन वेळा हल्ला करते. तिने बाळाला पकडलेलेही असते पण जिराफ सिंहीणीवर सतत पायांनी मारते. यामुळे सिंहीणीला आपली शिकार तिथेच सोडून पळून जावे लागते. असेच आपली आई देखील प्रत्येक संकटात, सुख-दुख:त आपल्यासोबत असते. आपली काळजी घेते.
Reel साठी वाट्टेल ते! धावत्या ट्रेनसमोर पुलावरून तरुणांनी मारली उडी; भयानक, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
— Damn Nature You Scary (@AmazingSights) August 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AmazingSights या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, आई आहे म्हणून सगळं शक्य आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने आई ही आईच असते, ती आपल्या लेकरासाठी कोणताही धोका पत्करायला तयार असते असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
एक चूक अन्…! पुराच्या प्रवाहात गाडी चालवणं चालकाला पडलं महागात; जोरदार लाट आली अन्.., Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.