Dombivli Young women beaten up for saying Excuse me Hindi vs Marathi speakers
मुंबई : महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांवर अन्याय केल्याचा आरोप अनेकदा केला जातो. याचे व्हिडिओ देखील समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर मात्र दोन तरुणींनी डोंबिवलीमध्ये एक्सक्युज मी म्हटल्यामुळे सात जणांकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंदी आणि मराठी भाषिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचे दिसून आले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डोंबिवलीमध्ये हा प्रकार घडला आहे. डोंबिवली पश्चिम येथील जुनी डोंबिवली परिसरात एका साध्या “एस्क्युज मी” या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झाला. तरुणी इंग्रजीमध्ये बोलल्यामुळे मराठी भाषिकांनी मराठीमध्ये बोला म्हणत मारहाण केली आहे. गणेश श्रद्धा बिल्डींगमध्ये राहणाऱ्या शेजराऱ्यांमध्ये ही हाणामारी झाली. पुनम अंकीत गुप्ता या महिलेला इंग्रजीत बोलल्याने “मराठीत बोला” असे सांगून तिला आणि तिच्या कुटुंबीयांवर बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तक्रारदार महिला या त्यांच्या मैत्रिणीसोबत या सोमवारी (दि.07) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरी येत होत्या. त्या त्यांच्या गाडीवरुन घराकडे येत होत्या. त्यावेळी इमारतीबाहेर रस्त्यावर उभे राहून मारहाण करणारे आणि त्यांची पत्नी भांडत होते. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना बाजूला होण्यासाठी ‘एक्स्युज मी’ असे इंग्रजी म्हटले आणि त्यावेळी विरोधक आणि त्यांची पत्नीने ‘इंग्रजीत नको, मराठीत बोला’ म्हणत असे म्हणत तक्रारदार आणि पुनम अंकीत गुप्ता आणि त्यांच्या बहिणीला बेदम मारहाण केली. मारहाणीत पुनम यांच्या नाकातले तुटून नुकसान झाले.
तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील तक्रारदार महिलांना मारहाण केली. यामध्ये चार ते पाच महिला आणि तीन तरुण होते. यावेळी तक्रारदार महिलेच्या कडेवर मुल देखील होते. मात्र या बाळाची पर्वा न करता त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 115(2), 352, 324(4) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या हिंदी भाषिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल दणका देखील दिला. यामुळे राज ठाकरे यांना अखेर कार्यकर्त्यांना ही प्रकार थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. मात्र हिंदी भाषिकांना त्रास दिल्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणे होत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली.