Driving in the floodwaters cost the driver dearly VIDEO VIRAL
सध्या देशात अनेक राज्यांमध्ये मुसधार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्यात बुडाली आहे, पूल तुटले आहेत, रस्ते वाहून गेले आहेत. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाली आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि काही लोकांच्या नाहक चूकीमुळेही बळी गेले आहेत.
असे म्हणतात निसर्ग शांत असताना त्याची काळजी घ्यावी, आणि निसर्ग खवळला तर त्याच्यासमोर साहस दाखवण्याचे प्रयत्न करु नयेत. परंतु काही लोकांना आपला जीव धोक्यात घालण्याची जास्त हौस असते. सध्या असाच एका व्यक्तीला त्याचे धाडस नडले आहे. ही घटना मोहालीतील नयागावच्या माजरी गावात घडली आहे. येथे मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली होते. अनेक रस्त देखील पाण्याने भरले होते. समुद्र निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली होती.
दरम्यान यावेळी एका SUV चालकाने या पाण्याच्या प्रवाहामध्ये गाडी चालवण्याचे धाडस केले. त्याला वाटले की, गाडी सहज रस्ता पार करु शकेल. त्याला अनेक लोकांनी समजून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण त्याने कोणाचेही ऐकले नाही. चालकाने पाण्याच्या प्रवाहात गाडी घातली. यावेळी पाण्याचा प्रवाह देखील जोरदार होता. समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटांसारख्या लाटा उसळत होत्या. यावेळी अचानक एक मोठी लाट आली आणि गाडी वाहून गेली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बाप रे! महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
व्हायरल व्हिडिओ
Only condition to buy a THAR*
Dimag girvi rakhna padega pic.twitter.com/hc0XKUPPDv— Sachya (@sachya2002) August 29, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sachya2002 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत हिरोगिरी नडली असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी यावर दु:खही व्यक्त केले आहे. एका युजरने छान झाले, थेट नरकात पोहोचले असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने डोकं गुडघ्यात घेऊन फिरत होते असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हिरोगिरी नडली असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
थरारक! मगरीच्या पिल्लावर तुटून पडला सिंहाचा कळप; एकाने पाय धरला, एकाने जबडा अन्…, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.