Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral

Red Wine River : भट्टीची टाकी फुटली अन् रस्त्यावर वाहून गेली लाखो लिटरची रेड वाईन. व्हिडिओ पोर्तुगालच्या एका शहरातील असल्याचे सांगण्यात येत असून तो सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 28, 2026 | 02:49 PM
दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पोर्तुगालमधील एका शहरात रेड वाईन तयार करणाऱ्या भट्टीतील टाकीचा स्फोट झाल्याने सुमारे २२ लाख लिटर रेड वाईन रस्त्यावर वाहून गेली.
  • वाईनचे प्रमाण इतके प्रचंड होते की रस्ते आणि गल्ली नद्यांसारख्या दिसू लागल्या. हा संपूर्ण थरार स्थानिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून याला लाखो व्युज मिळाल्या आहेत.
सोशल मिडियावर नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ फार वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पोर्तुगालचा असल्याचे सांगण्यात येत असून इथल्या रस्त्यांवर आपल्याला एक लाल पाण्याची नदी वाहताना दिसते. व्हिडिओतील दाव्यांवर विश्वास ठेवला तर ही नदी साधी सुधी नसून रेड वाईनची नदी आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलंत, पोर्तुगालच्या एका शहरांत रेड वाईनची अनोखी नदी वाहताना दिसली. ही नदी नैसर्गिक नसून एका घटनेमुळे ती तयार झाली. चला तर मग नक्की काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पोर्तुगालचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘पोर्तुगीज शहरातील एका रेड वाईन बनवणाऱ्या भट्टीतील टाकीचा स्फोट झाल्याने सुमारे २२ लाख लिटर वाईन वाहून गेली.वाईनचे प्रमाण इतके प्रचंड होते की ते पूर आलेल्या नदीसारखे दिसत होते’. व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर रेड वाईनचे प्रमाण इतके प्रचंड आहे की रस्ते आणि गल्ल्या नद्यांसारख्या दिसतात. रेड वाईन सर्वत्र वाहत आहे, ज्यामुळे असे दिसते की रेड वाईनचा पूर परिसरात आला आहे. वाइन साठवणूक टाक्या दाब सहन करू न शकल्याने अचानक हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. काही मिनिटांतच लाखो लिटर वाइन बाहेर पडू लागले. स्थानिकांनी हे दृश्य त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुर्तगाल के एक शहर में Red Wine 🍷 बनाने वाली भट्टियों का टैंक फटने से तकरीबन 22 लाख लीटर वाइन बह गई। यह वाइन की मात्रा इतनी अधिक थी कि बहते हुए बाढ़ से प्रभावित नदी जैसी लग रही थी। pic.twitter.com/7GbnHOM9PB — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) January 27, 2026

 

दरम्यान हा व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर ही घटना भारतात घडली असती तर सगळे भांडे घेऊन गेले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, पण ही वाइन चोरताना कोणीही दिसत नाही.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral portugal streets turn red as two million litres of wine spill viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • viral news
  • viral video
  • Wine

संबंधित बातम्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
1

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral
2

पोलिस ठाण्यात प्रेमाचे चाळे, मागून आली अन् खुर्चीवर बसलेल्या सहकर्मचाऱ्याला केलं KISS, ऑन-ड्यूटी कर्मचारी निलंबित; Video Viral

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट
3

प्रँकच्या नावाखाली हद्द केली पार, झोपलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना लावली आग; Viral Video पाहून यूजर्समध्ये संतापाची लाट

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
4

Viral : “भारतीय म्हणून मरायचे आहे”, ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.