
निसर्गाचा रौद्र अवतार! जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर कोसळली वीज, दुबईच्या क्राउन प्रिन्सने शेअर केला थरारक Video
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लहान पण अद्भूत आहे. व्हिडिओमध्ये निळ्याशार आकाशात उभी असलेली बुर्ज खलिफाची इमारत दिसून येते. सर्वकाही ठीक असतानाच अचानक मोठा प्रकाश दिसतो आणि बुर्ज खलिफाच्या शिखरावर आपल्याला वीज कोसळतानाचे दृश्य दिसून येते. यासोबतच व्हिडिओमध्ये पावसाचा आणि ढगांच्या कोसळण्याचाही आवाज ऐकू येतो ज्याने हे दृश्य आणखीन भीतीदायक बनते. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय हवामानशास्त्र केंद्राने युएईच्या अनेक भागात अस्थिर हवामान, पाऊस, वादळे, वीज आणि गारपीटीचा इशारा जारी केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने आता सर्वांनाच आश्चर्यचकित केलं असून सोशल मीडियावर ही घटना वेगाने शेअर केली जात आहे.
‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral
हा व्हिडिओ @faz3 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अद्भुत!! जादू क्षणार्धात घडते ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुबईमध्ये पाऊस वेगळाच पडतो, शहर क्षणभर शांत होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ढगाळ आणि पाऊस पडत असताना निळे आकाश कसे काय दिसत आहे ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.