(फोटो सौजन्य – Instagram)
बुधवारी शहीद अमजद खान यांचे पार्थिव घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या दिड वर्षांच्या चिमुकल्या मुलीला अंतिम दर्शनासाठी त्यांच्या पार्थिवाजवळ आणण्यात आले. वडिलांचे पार्थिव पाहून निष्पाप मुलगी “पापा…पापा…” असे ओरडत राहिली पण तिचे वडिला काही जागे झाले नाही. आपले वडिल झोपले आहेत असं समजून मुलीने वडिलांना मारलेली ती हाक अनेकांना भावूक करुन गेली. मुलीचे वडिलांवरील प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
व्हिडिओत काय दिसले?
व्हिडिओमध्ये शहीद अमजद खान यांचे पार्थिव घरी पोहोचताना दिसत आहे. पार्थिव एका शवपेटीत ठेवले आहे. शवपेटीजवळ येताच मुलगी तिच्या वडिलांना ओळखते. एक वर्षाची चिमुकली दबलेल्या आवाजात “पापा…पापा…” असे ओरडत आहे आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या क्षणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. व्हिडिओ अत्यंत भावनिक असून त्या चिमुरडीने दु:ख आभाळाएवढे आहे जे कधीही भरुन काढले शकत नाही. जवानाने देशासाठी स्वत:ला समर्पित केले खरे पण यामुळे दिड वर्षांच्या चिमुकलीचे छत्र मात्र हिरावून गेले.
हा व्हिडिओ @trolls_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला एक मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे पाहून माझे हृदय तुटले, देव त्याला शक्ती देवो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोकांना आता समजून घ्यायचे नाही, पण प्रत्येकाचे रक्त या मातीत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पप्पांसाठी रडणाऱ्या मुलाला पाहून मन हेलावून गेले. शहीद झालेल्या एसओजी जवानाला सलाम”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






