(फोटो सौजन्य – Instagram)
‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral
काय दिसलं व्हिडिओत?
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही डॉल्फिन एकत्र पाण्याची मजा लुटताना, पोहताना दिसून आल्या. हे दृष्य मनाला सुखावणारं होतं. त्यांच्या या अनपेक्षित आगमनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. व्हिडिओची सुरुवात समुद्रकिनाऱ्याच्या एका काँक्रीटच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या गटाने होते. ते आत झुकतात आणि पाण्यात पाहतात, बोट दाखवतात आणि उत्सुकतेने पाहत राहतात. गर्दीपासून कॅमेरा दूर जाताच, आपल्याला पाण्यात डॉल्फिनचा एक छोटा गट एकत्र पोहताना दिसतो. पाण्यात डॉल्फिन आणि पाण्याच्या वर उडणारे पक्षी हे या दृष्यांना आणखीनच सुंदर बनवतात. लोकांनी आता या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत भारतात परतलेल्या डॉल्फिनचे मनापासून स्वागत केले आहे तर काहींनी त्यांच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला आहे.
हा व्हिडिओ @savinchauhan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुंबईकर डॉल्फिनच्या आश्चर्यकारक भेटीचे साक्षीदार बनले’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “डॉल्फिन देखील धुरंधर बघायला आला वाटत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “डॉल्फिन विचारात असेल की मेस्सी आला का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांना वाटलं आपण दुबईला येतोय पण हबीबी नाहीये, हे मुंबई वरळी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






