तलावातून बाहेर येताच मगरीला हिणवू लागला हत्ती, अंगावर ओतू लागला माती मग पाण्याच्या राक्षसाने जे केलं... Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. इथे कधी भन्नाट जुगाड शेअर केले जातात तर कधी धक्कादायक अपघात तर कधी हास्यास्पद व्हिडिओही इथे पोस्ट केले जातात. हे सर्वच व्हिडिओ लोकांच्या मनोरंजनाचे काम करतात आणि म्हणूनच फार कमी वेळात ते व्हायरल होतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी निगडित व्हिडिओज देखील शेअर केले जातात ज्यातील दृश्ये आपल्या कल्पनेपलीकडची असतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक हत्ती मगरीला त्रास देताना दिसून आला.
मगर आणि हत्ती हे दोघेही जंगलातील धोकादायक आणि विशाल असे प्राणी आहेत. हत्ती हा मुळातच आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. तर मगर आपल्या शिकारीसाठी जंगलातील धोकादायक प्राणी म्हणून नामांकित आहे. आपल्या चातुर्यामुळे मगरीला पाण्याचा राक्षस असे म्हटले जाते. अशात जेव्हा हे दोन्ही प्राणी सामोरासमोर येतात तेव्हा नक्की काय घडत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर आता तुमच्या डोळ्यांनी पाहा. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक हत्ती मगरीवर हल्ला करताना दिसून आला.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात तलावासमोरचे दृश्य दिसते. इथे तुम्ही हत्ती आणि मगरीला तलावाबाहेर पाहू शकता. मगर आणि हत्ती दोघेही आमनेसामने असतात यावेळी मगर हत्तीपासून आपली नजर चुकवत असते आणि त्याचवेळी गाजराचा राग येतो आणि तो मगरीवर आपल्या पंजाने वाळू फेकू लागतो. हे अनोखे दृश्ये सर्वांसाठीच फार नवे आणि मजेदार आहे. मगर मात्र यावर आपली काहीच प्रतिक्रिया न देताना दिसून येते. कदाचित हत्तीसमोर मगरीचा काही निकाल लागणार नाही ते तिला समजले असावे. युजर्स मात्र हा व्हिडिओ आता वेगाने शेअर करत त्याची मनसोक्त मजा लुटत आहेत.
मगर-हत्तीचा हा व्हायरल व्हिडिओ @elephantsofworld नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘व्हिडिओमध्ये कोणत्याही कारणाशिवाय हत्तीने नाईल मगरीवर माती फेकत आहे’ असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला खात्री आहे की त्याच्याकडे कारणे असतील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटतं तो त्याला निघून जायला सांगत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.