(फोटो सौजन्य: Instagram )
सोशल मीडियावर काय पाहायला मिळेल, याबाबत काही सांगता येत नाही. काही दृश्ये धक्कादायक असतात तर काही आपल्याला खूप हसवतात. पण नुकताच सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला पाहून तुम्हाला हसूच नाही फुटेल तर आश्चर्याचा धक्काही बसेल. यामध्ये एक प्रियकर आपल्या प्रेयसीला लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातो. दोघेही समुद्राजवळ उभे राहून लाटांसोबत थंड वाऱ्याचा आनंद घेतात, पण नंतर असे काही घडते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. व्हिडीओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रियकर आणि गर्लफ्रेंड समुद्राजवळ खूप आनंदी दिसत आहेत. प्रियकर आपल्या प्रेयसीचा हात धरून तिला समुद्राच्या लाटांच्या जवळ घेऊन जातो, जेणेकरून त्या दोघांनाही समुद्राच्या लाटा आणि वाऱ्याचा पूर्ण आनंद घेता येईल. दोघेही आनंदी आहेत आणि एकमेकांसोबत या सुंदर क्षणाचा आनंद घेत आहेत. मग अचानक प्रियकराच्या मनात एक कल्पना येते आणि तो आपल्या मैत्रिणीला एका उंच दगडावर घेऊन जातो. तिथे उभे राहून दोघेही समुद्राच्या लाटा जवळून पाहत आहेत. इथेच एक मजेदार घटना घडते.
यापुढे बुमराह मलिंगाही होतील फेल, तरुणाची बॉलिंग स्टाईल पाहून तुम्हीही व्हाल दिवाणे; Video Viral
ते दोघेही उंचीवर पोहोचताच समुद्राची एक उंच लाट येऊन दगडावर आदळते. त्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी दोघेही त्या लाटेत अडकतात. लाटांची टक्कर इतकी जोरदार होती की दोघेही हवेत उडत दूरवर पडले. हे दृश्य इतके भितीदायक होते की युजर्स ते पाहून थक्क झाले. माहितीनुसार, हे दोघेही या अपघातातून सुखरूप बाहेर पडले.
हा व्हायरल व्हिडिओ @dramebaazchhori99 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ‘बीच वाइब्स घ्यायला गेला होता’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा मेहबूबाच वाहून गेली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “समुद्राने हल्ला केला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.