Eswatini's King Mswati III old Video of Abu Dhabi tour goes viral
African Country King Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वत्र गोंधळ घातला असून हा एक जुना व्हिडिओ आहे. हा आफ्रिकन देश इस्वातिनीचा राजा मस्वती तिसरा यांचा आहे. या व्हिडिओमध्ये राजा अबू धाबी विमानतळावर आपल्या कुटुंबासोत उतरताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या राजाला १५ बायका, १०० नोकर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजा मस्वती तिसरे एका खाजगी विमानातून उतरताना दिसत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अनेक लोक जमले आहे. त्यांनी एक पारंपारिक पोशाख परिधान केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत. तसेच मोठ्या संख्येने त्यांचे नोकरही आहे. वृत्तानुसार, राजा मस्वती यांनी ३० मुले देखील आणली होती. या मोठ्या शाही एन्ट्रीमुळे विमानातळावर सुरक्षा व्यवस्था वाढवाली लागली होती. अेक टर्मिनल्स बंद करावे लागले होते.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर लोकांना नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी राजा देशात गरीबी असताना इतका खर्च कसा करु शकतात असा प्रश्न केला आहे. एका नेटकऱ्याने, त्यांच्या देशातील लोकांकडे आजही मूलभुत सुविधा नाहीत, मग हे राजा खाजगी जेटमधून कसे फिरु शकता. त्याच्या विमाना प्रवासाठी पैसे आहेत का? आहेत तर ते कुठून आले असे प्रश्न नेटकऱ्यांनी केले आहेत.
राजा मस्वती तिसरा हे आफ्रिकन देशांचा शेवटचा राजा आहे. त्यांनी १९८६ पर्यंत इस्वातिनीवर राज्य केले होते. त्यांची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असल्याचा अंदाज वर्तवला जातो. सध्या इस्वातिनीमध्ये आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. येथील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा पडला आहे. तसेच आर्थिक अडचणींमुळे अनेत विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये २३% बेरोजगारी होती, जी सध्या ३३.३% वाढली आहे. सध्या इस्वातिनीची ६०% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. यामुळे राजाच्या शाही जीवनशैलींमुळे हा देशत सतत टीकांचा सामना करत असतो. येथील लोकांमध्ये देखील नाराजी आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.