अशा मित्रांपासून सावध रहा! पठ्ठ्यासोबत मित्रांनी असा प्रॅंक केला की त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही, मजेशीर VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Prank Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल आपल्याला पाहायवा मिळतात. यामध्ये तुम्ही काही प्रँकचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. सध्या असाच एक मित्रांच्या पठ्ठ्यासोबतचा प्रॅंक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अलीकडे लोक एकमेकांवर प्रँक करत असतात. हे आता खूप सामान्य झाले आहे. जसे आपण १ एप्रिलच्या दिवशी लोकांना एप्रिलफूल बनवतो. तसेच हा प्रॅंक देखील असते. काही प्रँक तसेच मजेशीर असतात, पण काही असे प्रॅंक असतात की यामुळे समोरचा व्यक्ती नाराज होऊ शकतो. त्याला गंभीर दुखापत होऊ शकते. पण लोक याचा जास्त विचार करत नाही.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ काही मित्रांनी त्यांच्या एका मित्रासोबत मजेशीर प्रॅंक केला आहे. पण यामुळे मित्र चांगलाच चिडला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की काही मुले एका मैदानावर खेळत आहे. तिछे एक मुलगा झुकून उभा राहिलेला आहे. तर दुसरा मित्र त्याच्यावरुन उडी मारुन दाखवत आहे. तिछे एक पाण्याचा तलाव आहे. पण त्यावर झाडांची पाणे पडल्यामुळे संपूर्ण तलाव झाकला गेला आहे. हे गोष्ट ज्याच्यावर प्रॅंक केला जात आहे त्याला माहित नसते. यामुळे तो देखील मित्राच्या अंगावरुन उडी मारतो. पण तो दणकन पाण्यात आदळतो आणि पूर्ण भिजतो. सर्व मित्र त्याच्यावर हसायला लागतात.
व्हायरल व्हिडिओ
ऐसे दोस्तो से हमेशा सावधान और सतर्क रहें।😂🤣pic.twitter.com/0Kf5Z4kq49 — Tanisha (तनिषा) (@jtanu98) October 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jtanu98 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत असे हरामी मित्र नकोत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.