
पतीने पत्नीला हॉटेलमध्ये मित्रासोबत रंगेहाथ पकडलं, डोळ्यात भरले अश्रू अन् म्हणाला, "लग्नाच्या 15 वर्षात... "; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
पती रवी गुलाटी म्हणाला की, त्याने २५ एप्रिल २०१० रोजी हिमानीशी लग्न केले. त्यांना मुले आहेत. रवी म्हणतो की तो नेहमीच असा विश्वास ठेवतो की लग्नात चढ-उतार येतात, परंतु मुले आणि कुटुंबासाठी तडजोड करणे आवश्यक आहे. रवीच्या मते, २०१८ मध्ये, त्याची पत्नी एकदा एका हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरूषासोबत पकडली गेली होती. त्यावेळी दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत चर्चा झाली, माफी मागितली गेली आणि नाते वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. यावेळी परिस्थिती आणखीच त्रासदायक ठरली. रवीने सांगितले की त्याची पत्नी दुपारी ३ ते ३:३० च्या सुमारास घराबाहेर पडली, पण त्यानंतर तिने फोन उचलला नाही. १५-२० वेळा फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सततच्या संशयामुळे रवीने त्याच्या पत्नीच्या अॅक्टिव्हावर जीपीएस ट्रॅकर बसवला. जेव्हा लोकेशन तपासले तेव्हा त्यात एका हॉटेलची माहिती होती. रवीने त्याचे दुकान बंद केले आणि तो थेट हॉटेलमध्ये गेला.
Amritsar, Punjab — 15 साल की शादी के बाद पति ने वो देखा, जिसकी कल्पना भी किसी के लिए विनाशकारी होती है।
पत्नी होटल में “दोस्त” के साथ रंगे हाथों पकड़ी गई।
कैमरे के सामने पति ने अपनी दर्दनाक हकीकत सुनाई—आँखों में आँसू, आवाज़ में टूटन। लेकिन असली सच्चाई इससे भी कड़वी है।
जब बेवफाई… pic.twitter.com/KNTZhsYWkM — ShoneeKapoor (@ShoneeKapoor) December 15, 2025
हाॅटेलमध्ये पोहचताच रवीने त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत रंगेहात पकडलं. हे दृश्य त्याच्यासाठी त्रासदायक होत. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो म्हणाला, “मी गेल्या एक वर्षापासून संशयाच्या भोवऱ्यात जगत आहे… मला वाटले की कदाचित मी चुकीचा आहे, पण आज सर्व काही उघडकीस आले आहे.”रवीचे वडील परवेझ गुलाटी म्हणाले की, ही समस्या नवीन नाही. पाच ते सात वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी एकत्र बसून चर्चा केली होती. कुटुंबाचा आरोप आहे की, ज्या पुरूषासोबत ती महिला हॉटेलमध्ये दिसली होती त्याला सुरुवातीला कुटुंबाने त्यांचा “भाऊ” म्हणून ओळख करून दिली होती. दरम्यान पत्नीने आता स्पष्टपणे पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे आणि तिला तिच्या पालकांच्या घरी परत जायचे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.