(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, रात्री तापमानात मोठी घट झाली आहे, तर प्रदूषणाची पातळी देखील वाढली आहे. हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे, अनेक निरीक्षण केंद्रांवर हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 450 च्या वर गेला आहे, ज्यामुळे शहराचा मोठा भाग धोक्याच्या क्षेत्रात आला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ग्रेटर नोएडातील असून १४ डिसेंबर रोजी याला शूट करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये प्रदूषणाची दाट धुके संपूर्ण परिसरात पसरल्याचे दिसून येते. महिला जेव्हा बाल्कनीतून फोनचा कॅमेरा बाहेर काढते तेव्हा त्यात प्रदूषणाव्यतिरिक्त आणखी काहीही दिसत नाही. चारही दिशेला जे दिसते ते फक्त प्रदूषणचं असते.
दाट धुक्यामुळे, दिल्ली विमानतळाने प्रवाशांना विमानांच्या वेळापत्रकात संभाव्य व्यत्यय येण्याची सूचना जारी केली. या इशाऱ्यात म्हटले आहे की, “दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो.” दरम्यान, महामार्गावर वाहने एकमेकांशी टक्कर देत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. नोएडा आणि दिल्लीच्या काही भागात उंच इमारतींमधील व्हिडिओंमध्ये रस्त्याच्या पातळीवर जवळजवळ शून्य दृश्यमानता दिसून आली. लोकांनी पहाटेचे व्हिडिओ पोस्ट केले ज्यात ते हंगामातील सर्वात दाट धुके असल्याचे वर्णन केले आणि खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल व्यापक चर्चा करण्याचे आवाहन केले. दरम्यान वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @yaminiratrachawla नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






