Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Woman Fake TTE Viral Video : बनावट TTE चा अजब प्रकार ! गळ्यात चिनी ID कार्ड, प्रवाशांकडून हजारो रुपये वसुलीचा प्रयत्न

Woman Fake TTE Viral Video : सिकंदराबाद-हावडा फलकनुमा एक्सप्रेसमध्ये टीटीई असल्याचे भासवून प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, महिलेच्या ओळखपत्रावर चिनी भाषेत मजकूर असल्याने प्रवाशांना संशय.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 15, 2026 | 10:12 PM
Fake TTE Caught in Falaknuma Express ( फलकनुमा एक्सप्रेसमध्ये बनावट टीटीई पकडला )

Fake TTE Caught in Falaknuma Express ( फलकनुमा एक्सप्रेसमध्ये बनावट टीटीई पकडला )

Follow Us
Follow Us:
  • ID CARD चिनी अक्षरात छापलेले होते  
  • प्रवाश्यांना महिलेवर संशय आला   
  • सोशल मिडिया युजर्सच्या प्रतिक्रिय 
Woman Fake TTE Viral Video : सिकंदराबाद आणि हावडा दरम्यान धावणाऱ्या फलकनुमा एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक १२७०४) एका स्लीपर कोचमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःला टीटीई म्हणवणाऱ्या एका महिलेने प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समोर येत आहे. यामध्ये ही महिलेच्या गळ्यात लटकलेल्या ओळखपत्रावर चिनी भाषेत मजकूर लिहिला होता. ज्यामुळे प्रवाशांना संशय आला.जेव्हा एका प्रवाशाने तिला या बद्दल विचारले असता.ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय

 ID CARD चिनी अक्षरात छापलेले होते

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, ती महिला स्लीपर कोचमध्ये फिरताना आणि प्रवाशांची तिकिटे तपासताना दिसते. ती काही प्रवाशांकडून १,३०० ते १,४०० रुपयांपर्यंत दंड आकारतेय. असा आरोप आहे की, तिने ओडिशाच्या प्रवासासाठी अतिरिक्त ७५० रुपयांची मागणी देखील केली. त्या महिलेने गळ्यात एक लाल रंगाचे ओळखपत्र घातले होते, ज्यावर ‘QIONGXI ID CARD’  चिनी अक्षरात छापलेले होते. हे रेल्वेचे अधिकृत ओळखपत्र नाही.

प्रवाश्यांना महिलेवर संशय आला

प्रवाश्यांना या महिलेवर संशय आला आणि त्यांनी तिला तिचे ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. तिने सुरुवातीला नकार दिला आणि वाद घालू लागली. जेव्हा कार्ड दाखवण्यात आले, तेव्हा त्यावर चिनी भाषा स्पष्टपणे दिसत होती. डब्यात एकच गोंधळ उडाला. जवळचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी जमा झाले. व्हिडिओमध्ये, ती महिला तिच्या फोनकडे बघत वाद घालताना दिसते.

हा संपूर्ण व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यात कार्ड आणि वाद दोन्ही स्पष्टपणे दिसत आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आणि शेअर केला. चिनी कार्ड वापरून कोणी बनावट टीटीई म्हणून कसे वावरू शकते, यावर सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Surat Viral Video : धावत्या लक्झरी बसमधून चिमुकला पडला; CCTV फुटेज पाहून उडेल थरकाप

सोशल मिडिया युजर्सच्या प्रतिक्रिय

सोशल मिडिया युजर्सने लिहिले आहे की, “आता बनावट टीटीई सुद्धा आयात केले जातात!” काहींनी रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, आरपीएफ आणि खरे कर्मचारी उपस्थित असूनही अशी घटना कशी घडली, असा प्रश्न विचारला. अनेक प्रवाशांनी सांगितले की त्यांना बनावट टीटीईंच्या प्रकरणांमुळे अनेकदा त्रास होतो, पण इतकी उघड आणि विचित्र फसवणूक त्यांनी पहिल्यांदाच पाहिली. काहींनी सुचवले की प्रवाशांनी नेहमी खऱ्या टीटीईंचा गणवेश आणि अधिकृत ओळखपत्र तपासावे.

IRCTC Food Controversy : रेल्वेच्या जेवणात निष्काळजीपणाचा कळस! डाळीत धातूचा तुकडा, व्हिडिओ व्हायरल होताच IRCTC कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: फलकनुमा एक्सप्रेसमध्ये काय घडले?

    Ans: एका महिलेने स्वतःला टीटीई सांगून प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला.

  • Que: ओळखपत्रावर काय लिहिले होते?

    Ans: लाल रंगाच्या ओळखपत्रावर 'QIONGXI ID CARD' असा मजकूर चिनी अक्षरांसह दिसत होता.

  • Que: महिलेवर संशय का आला?

    Ans: महिलेचे ओळखपत्र अधिकृत रेल्वे ओळखपत्रासारखे नसल्याने प्रवाशांना तिच्यावर संशय आला.

Web Title: Falaknuma express fake tte woman chinese id card viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • Instagram News
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क
1

Viral Grandmother Video : वय हा फक्त एक आकडा! हरियाणाच्या आजीची बुलेट राईड पाहून Gen Z सुद्धा होईल थक्क

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल
2

Suryakumar Yadav Viral Video : मैदानावर स्टार, जेवणात साधेपणा ! सूर्यकुमार यादव-सरफराज खानचा मटण पार्टीचा VIDEO व्हायरल

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले
3

Meerut CCTV Viral Video : लायटर लावला अन् साडीच्या दुकानाने घेतला पेट; CCTV पाहून व्यापारीही हादरले

Bride Mud Viral Video : लग्नाचा हॅाल काही मिनिटांवर असतानाच काळाचा घाला? नवरीची कार थेट शेतात पलटी, VIDEO व्हायरल
4

Bride Mud Viral Video : लग्नाचा हॅाल काही मिनिटांवर असतानाच काळाचा घाला? नवरीची कार थेट शेतात पलटी, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.