पावसाने केला घात, पिकाची पुन्हा वाट, बळीराजाला दुःख सोसवेना; पीक वाहून जाताच शेतकऱ्याने केलं असं काही... हृदयद्रावक Video Viral
शेतकऱ्याचं जीवन अनेक संघर्षांनी भरलेलं आहे. संपूर्ण जगाला जो अन्नधान्य पुरवतो अनेकदा त्याच्यावरच उपासमरीची वेळ येते. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, कीटकांचा प्रार्दुभाव यांमुळे अनेकदा पिकाचे नुकसान होते. यांनतर पीक चांगले पिकले तरीही बाजारात शेतकऱ्याला आपल्या कष्टाचे योग्य मूल्य दिले जात नाही. ना हातात पीक राहते, ना पैसे… असते ती फक्त निराशा आणि पदरी येते दुःख.
अवकाळी पावसाने सध्या सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले असून याचाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शेतकऱ्याची झालेली अवस्था तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील असून इथे काही शेतकरी शेंगदाणे विकण्यासाठी आलेले असतात. पण अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो आणि शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पावसाच्या पाण्यासह वाहू लागते. यानंतर हताश झालेला शेतकरी असे काहीतरी करतो ज्याने सर्वांचेच डोळे पाणावतात.
बाजाराच्या या व्हिडिओमध्ये, शेतकरी आपले पीक ओले झालेले पाहून असहाय्य झालेला दिसून येतो. आपले पीक वाचवण्यासाठी तो पावसात रस्त्यावर जाऊन बसतो आणि पोत्याने ते थांबवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि दुःख स्पष्ट दिसून येते, जिवाच्या आकांताने तो आपले पीक वाचवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचे सर्व प्रयत्न निरर्थक होताना दिसून येतात. सुमारे ३९ सेकंदांची ही छोटी क्लिप शेतकऱ्याची असहाय्यता दाखवून देते. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मजबूर किसान बारिश के बीच अपनी मूंगफली की फसल को बहने से बचाने की कोशिश कर रहा है। pic.twitter.com/gnWfRcSVGS
— Ritesh Mahasay (@MahasayRit11254) May 16, 2025
बळीराजाचा हा व्हिडिओ @MahasayRit11254 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘असहाय्य शेतकरी पावसात त्याचे शेंगदाणे पीक वाहून जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून अनेक युजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेती हा व्यवसाय आहे, तो professional पद्धतीने करावा, आपली वस्तू विक्री होइपर्यंत सांभाळून ठेवावी लागते, फार खर्च होत नाही पण नियोजन करावे…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप वेदना होतात असे पाहून, 4 महिन्याची मेहनत वाया गेली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.