
शेवटी लेकीचा बाप तो... परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्... Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वडील रेल्वे स्टेशनवर उभे असल्याचे दिसते, तर त्यांची लेक रेल्वेच्या दारावर उभी राहून त्यांना निरोप देत असते. बहुतेक शिक्षणासाठी अथवा नव्या जॉबसाठी ती परगावी जात असावी. ट्रेन सुटणार असते ज्यामुळे वडील दुरूनच मुलीला बघत राहतात आणि मुलीचा चेहरा आपल्या डोळ्यात साठवत असतात. यादरम्यानच मुलगी बाबांना पाहून कोरियन स्टाईलमध्ये आपल्या बोटांचा हार्ट तयार करून बाबांना शेवटचा निरोप देऊ पाहते पण बाबांना तिचा इशारा काही समजत नाही आणि हार्ट बनवण्याऐवजी ते थेट खिशात हात घालून तिला काही पैसे देऊ करतात. मुलीचा इशारा बाबांनी बोटांचा हार्ट तयार करत तिला निरोप द्यावा असा असतो पण भोळ्या वडिलांना मात्र ती त्यांच्याकडे पैसे मागत असल्याचे वाटते. व्हिडिओच्या शेवटी मुलगी वडिलांनी दिलेले पैसे हसत हसत आपल्या हातात ठेवताना दिसते त्यानंतर ज्यानंतर वडील तिला निरोप देतात.
माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral
बाप-लेकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ @viralbhayani नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपण कितीही श्रीमंत झालो तरी वडिलांना आपल्याला पैसे द्यायला फार आवडते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माझे वडील नेहमीच ट्रेनच्या बाहेर माझी वाट पाहायचे. खिडकीतून आमच्याकडे बघत राहायचे, मला आज त्यांची आठवण आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बाबा तुमची आठवण येते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.