(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माकड झाडावर फ्राईंग पॅन घेऊन बसल्याचे दिसून येते. सिंहीण झाडावर चढण्याचा प्रयत्न करताच, माकड लगेच तिच्यावर हल्ला करतो आणि फ्राईंग पॅनने वारंवार तिच्यावर हल्ला करू लागतो. सिंहीण देखील माकडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. सिंहीणीला असा माकडाचा मार खाताना पाहून युजर्स थक्क झाले तर काहींना आपले हसू अनावर झाले. पुढे काही क्षणातच असे दिसते की माकडाच्या हल्ल्याला कंटाळलेली सिंहीण झाडावरून खाली उतरत आहे.
व्हिडिओतील ही दृश्ये पाहता क्षणी वास्तववादी वाटत असली तरी यामागील सत्य काही वेगळेच आहे. हा व्हिडिओ खरा नसून पूर्णपणे एआयच्या मदतीने याला तयार करण्यात आले आहे. आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून असे अनेक व्हिडिओज तयार केले जातात ज्यातील दृश्ये पाहता क्षणीच आपल्याला खरे वाटू लागतात. पण हा फक्त आपल्या नजरेचा भास आहे सत्य नाही. सिंहिणीसारख्या विशाल आणि शक्तिशाली प्राण्याला मारण्याची ताकद माकडात नाही त्यामुळे व्हिडिओत दाखवण्यात आलेले हे दृश्य वास्तवात तरी घडून येणे अशक्य आहे. दरम्यान हा मजेदार व्हिडिओ @naturevoom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






