कोचिंगमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा आपल्या आश्चर्यात पाडणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही अनेक भांडणाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी मेट्रामधील भांडमांची तर कधी बसमधील. महिलांची, पुरूषांची, मुलांची भांडणे असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक दोन मुलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोचिंग सेंटरमधील दोन विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारे दोन विद्यार्थी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांवर जोरदार मारत आहे. त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा दुसऱ्या विद्यार्थ्याला बॅंच खाली ढकलत आहे. पण तो विद्यार्थी उठून तो समोरच्या विद्यार्थ्याला मारायचा प्रयत्न करतो. मात्र तो विद्यार्ती सतत चप्पलांचा वर्षाव करतो. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार कानाखाली मारायला सुरूवात होते. दरम्यान, चापट मारणारा मुलगा सीटखाली पडतो. मग तो पुन्हा उभा राहतो आणि समोरच्या मुलाशी भांडू लागतो. दोन विद्यार्थ्यांच्या भांडणाचा संपूर्ण वर्ग प्रेक्षक म्हणून आनंद घेत आहे. कोणीही त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
व्हायरल व्हिडिओ
Chappal-Kalesh b/w Two Bois inside Coaching Institute
pic.twitter.com/CP2ksyv6WF— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 4, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ कोणत्या कोचिंग सेंटरमधील आहे याची अद्याप कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केळी आहे की, भाऊ काय जबरदस्त भांडणे चालू आहेत, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नक्कीच मुलीवरून भांडणे चालली असणार यांची, तरआणखी एका युजरने म्हटले आहे की, व्हिडिओ पाहून मजा आली. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आमि लाईक केले आहे.