हटके एंट्री नवजोडप्याला पडली महागात; जोडपं कमळात जाऊन बसताच लागली जोरदार आग; लग्नसमारंभातील थरारक Video Viral
आजच्या काळात लग्न म्हणजे फक्त लग्न राहिले नाही. लग्नातील इतर पारंपारिक विधींमध्ये आता शोबाजीचीही हवा सर्वत्र पसरू लागली आहे. आजकाल लग्नसमारंभात नवजोडपं अनेक वेगळ्यावेगळ्या प्रकारे एंट्री घेतात. ही एंट्री काही साधीसुधी नसून यासाठी अनेक हटक्या पद्धती शोधून काढल्या जातात. मात्र हे हटके करणे अनेकदा लग्नात अडचणी निर्माण करतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात जोडप्याला आपली एंट्री चांगलीच महागात पडली आणि ही एंट्री अक्षरशः त्यांच्या जीवावर बेतली. नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
लग्नाला खास बनवण्यासाठी, काही लोक अशा कल्पना घेऊन येतात ज्यामुळे थेट त्रास होतो. आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पहा, तुमचे हृदय हेलावून टाकेल. हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे ज्यामध्ये वधू-वरांची एंट्री संस्मरणीय करण्यासाठी त्यांना एका कापडापासून तयार करण्यात आलेल्या कमळाच्या फुलात बसवले जातात. हे फुल बंद असते आणि हळूहळू याच्या पाकळ्या उघडताच वधू-वरचा चेहरा रिव्हील होतो. मात्र असे घडत नाही आणि हा गुलाब उघडण्याआधीच त्याला आग लागते.
आगीच्या ज्वाळा पाहून तिथे उपस्थित असलेले लोक घाबरतात आणि सर्वत्र एकच धुमाकूळ माजतो. यानंतर वधू वराला यातून बाहेर काढण्यासाठी काही लोक हातांनी पळत येऊन कमळाच्या पाकळ्या उघडू लागतात. व्हिडिओमध्ये वरही स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसून आला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हे थरारक दृश्य सर्व वर्हाड्यांनी आपल्या कॅमेरात कैद केले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओतील हे दृश्य सर्वांना धक्का देत असून लोक याला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
तरुणांना किडेबाजी भोवली; धावत्या बाईकवर उभे राहून स्टंट करायला गेले अन्…, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @ravi_arya_88 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या फालतूचे चोचले करायचेच कशाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे नक्की कुठले दृश्य आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.