(फोटो सौजन्य: X)
जंगलातील सर्वात धोकादायक शिकाऱ्यांमध्ये सिंहाचे नाव अग्रस्थानी! आपल्या ताकदीमुळे त्याला जंगलाचा राजा मानले जाते. मुळातच सिंह हा एक मांसाहारी प्राणी आहे, तो कधीही भाज्या खात नाही मात्र इंटरनेटवर नुकताच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सिंह भाजीची चव चाखताना दिसून आला. सिंहाच्या या कृतीने सर्वांनाच सुरवातीला धक्का बसला त्यानंतर सर्वांचे लक्ष त्याच्या प्रतिक्रियेवर खिळून राहिले. सिंह यावर काय प्रतिक्रिया देणार, त्याला भाजी आवडणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडू लागला मात्र भाजी चाखताच सिंह अशी काही रिऍक्शन देतो की ज्याने सर्वांनाच हसू अनावर होते. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक सिंह त्याच्या कुंपणात फिरताना दिसून येत आहे. तो चालत असतानाच त्याच्या पुढे एक भाजी पडलेली त्याला दिसते. कधीही न पाहिलेली ही भाजी पाहून सिंह त्याकडे एकटक पाहू लागतो आणि मग त्याची चव चाखण्यासाठी अलगद त्याला भाजीला आपल्या तोंडात टाकतो. पण भाजीची चव चाखताच सिंहाचा चेहरा बदलतो आणि तो तोंडातून त्या भाजीला काढून टाकतो. खरंतर सिंहाला भाजीची चव अजिबात आवडत नाही आणि यानंतर त्याच्या चेहऱ्यावर इतकी गमतीदार एक्सप्रेशन्स येतात की ते पाहून कुणालाही हसू फुटेल. सिंहाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल आणि शेअर केला जात आहे.
Lion tastes vegetables for the first time..🦁🥬😂 pic.twitter.com/1QX6YyJP6s
— Love Like Jesus (@JesusLovesALLx) April 24, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @JesusLovesALLx नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंहाने पहिल्यांदाच भाजीची चव चाखली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “निश्चितच तो शाकाहारी नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असे माझे कांदा खाल्ल्यावर होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.