
Viral Video
परदेशी महिला व्हिडिओमध्ये सांगते की, हिंदी शिकणे अजिबात अवघड नाही. तुम्हाला फक्त अच्छा शब्द वेगवेगळ्या प्रसंगी वापरता आला पाहिजे. या महिलेने या अच्छा शब्दाचा वापर होकार देताना, खूप छान बोलताना, समजल्याचे दाखवताना आणि दैनंदिन जीवनात इतर काही संवादांमध्ये कसा वापरायचा हे सांगितले आहे. ही ट्रीक परदेशी लोकांसाठी तर नक्कीच फायद्याची आहे. कारण अनेकदा त्यांना भारतात आल्यावर हिंदी बोलणे अवघड जाते. परंतु या व्हिडिओने भारतीयांचे लक्ष वेधले असून अनेकांनी महिलेचे कौतुक केलेले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, अच्छा… असं होय! तर दुसऱ्या एकाने मॅडम तुम्हाला भारतीयांचे गुपित कसं कळाले असे म्हटले आहे. आणखी काहींनी ही ट्रीक सगळीकडे चांगलीच कामी येते, अगदी मराठीमध्ये बोलताना सुद्धा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.