
Japan’s Ambassador eating biryani with his hands in Delhi
सध्या याचा एक अनोख संगम असणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत, खास करुन भारतीयांची. एक जपानी राजदूतांनी पहिल्यांदाच भारतीय स्टाईलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जपानचे राजदूत ओनो केइची आध्र भवनात जेवण करताना दिसत आहेत. त्यांनी काटा किंवा चमचा न वापरता हाताने बिर्याणी खाल्ली आहे. हा व्हिडिओ राजदूत ओनो केइची यांनी देखील स्वत: शेअर केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांरुन दिसून येते की, त्यांना हाताने बिर्याणी खाने आवडले आहे. त्यांना एका व्यक्तीने बिर्याणी हाताने कशी खायची हे देखील शिकवले आहे. हे दृश्य व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे.
अरेरे! प्रेयसीला भेटायला गेला अन्… ‘असं’ फुटलं पठ्ठ्याच्या बिंग, पाहा नेमकं काय घडलं VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत आमची भारतीय परंपरा पाश्चात्य संस्कृतीपेक्षाही चांगली आणि आरोग्यदायी आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, खूपच ग्रेट सर असे म्हटले आहे. आणखी काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहे. तसेच ही बाब अत्यंत अभिमानाची असल्याचे लोकांनी म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.