पती-पत्नीच्या मध्ये येत होता अलख पांडे तितक्यात खान सरांनी हात धरला अन् ओढतच बाजूला सारलं; मजेदार Video Viral
खान सरांची रिसेप्शन पार्टी सध्या सोशल मिडियावर एक चर्चेचा विषय ठरत आहे. खान सर, ज्यांचं खरं नाव फैजल खान आहे, हे एक प्रसिद्ध भारतीय शिक्षक आणि यूट्यूबर आहेत. ते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांचं YouTube चॅनल ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ देखील खूप लोकप्रिय आहे. अशात मागेच भारत-पाकीस्तान तणावाच्या काळात खान सरांनी गूपचूप आपलं लग्न उरकल्याची बातमी समोर आली होती. ही माहिती प्रथम विद्यार्थ्यांना देण्यात आली, ज्यानंतर त्यांच्या वर्गातील एक क्लिप व्हायरल झाली, ज्यातून त्यांनी लग्न केल्याची माहिती मिळाली. त्यातच आता त्यांच्या रिसेप्शन पार्टीचा एक मजेदार व्हडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी मजेदार आहेत की ती तुम्हाला हास्याने लोटपोट केल्याशिवाय राहणार नाहीत. चला काय घडलं ते जाणून घेऊया.
तर घडलं असं की, फिजीक्सचे वाल्लाहचे संस्थापक अलख पांडे सर वर-वधूसोबत फोटोशूट करण्यासाठी स्टेजवर गेले असता खान सरांनी त्यांना हळूच हाताला पकडत बाजूला सारण्याचे दिसून आले आहे. यावेळी ते खान सर आणि त्यांच्या नववधूच्या मध्ये उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसून आले मात्र यावेळी खान सरांनी केलेली कृती लोकांच्या मनोरंजनाचे काम करत आहेत.
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, त्यांच्या आनंदी स्वभावासाठी ओळखले जाणारे अलख पांडे सर फोटो काढण्यासाठी स्टेजवर चढले. या दरम्यान, उत्साहात ते थोडे जास्तच उत्साहित झाले आणि चुकून खान सर आणि त्यांच्या नवविवाहित पत्नीच्या मध्ये उभे राहिले यानंतर पाहतोय तर काय… खान सर लगेच त्यांना ढकलतात. जणू ते बोलत आहेत की, “अरे भाऊ, तु नवरा-बायकोमध्ये कुठे येत आहेस?”. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू अनावर झाले. विद्यार्थ्यांपासून सोशल मिडिया यूजर्सपर्यंत सर्वांनी या दृश्यांना ‘एपिक’ म्हटले. यावर अनेकजण आता मीम्स बनवत आहेत तर काही कमेंट्समध्ये यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
चलो हटो कहां मियां-बीवी के बीच में आ रहे हो😃
जी हां कुछ ऐसा ही मोमेंट क्रिएट हुआ है #खान_सर के रिसेप्शन में !!हुआ यूं कि Physics wallah वाले अलख पांडेय स्टेज पर फोटो शूट करवाने गए थे लेकिन गलती से वो खान सर और उनके #बीवी के बीच में खड़े हो गए तो तुरंत खाना सर ने उन्हें बगल… pic.twitter.com/Mh7Jg32pBC
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) June 2, 2025
खान सरांच्या या रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक बहुचर्चित लोकांची उपस्थिती पाहायला मिळाली. कार्यक्रमात तेजस्वी यादव, सम्राट चौधरी यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. रिसेप्शन पार्टीचा हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लोकांची पसंती मिळाली असून लोक व्हिडिओतील दृश्यांची मजा घेत, हा व्हिडिओ वेगाने शेअर करत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही