(फोटो सौजन्य: X)
मुलांचे भविष्य घडवण्यात शिक्षकाची प्रमुख भूमिका असते. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकाचा नेहमीच मोलाचा वाटा असतो. आपला मौलिक वेळ आणि कष्ट ते मुलांचे भविष्य घडवण्यात घालवत असतात. आजवर संघर्ष आणि यशाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या शिक्षकाविषयी सांगत आहोत त्याचा संघर्ष आणि कामाप्रतीची निष्ठा तुम्हाला प्रेरणा देऊन जाईल. शिक्षणासाठी मुलांनी खडतर प्रवास केल्याच्या अनेक गाथा आजवर आपण ऐकल्या आहेत मात्र मुलांचे भविष्य घडवण्यासाठी स्वतः अथक परिश्रम घेणारे अब्दुल मलिक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
आज आम्ही तुम्हाला केरळमधील अशा शिक्षकांविषयी सांगत आहोत जे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून चक्क नदी ओलांडून शाळेत जात आहेत आणि विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. यांचे नाव आहे अब्दुल मलिक. अब्दुल मलिक यांची कहाणी आता सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे अशात अनेकांना प्रश्न पडतो की हे नक्की आहेत तरी कोण? तर चला यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
अब्दुल मलिक कोण आहेत?
केरळमधील पडिंजट्टुमुरी येथील रहिवासी अब्दुल मलिक हे गणिताचे शिक्षक आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते मुलांना शिकवण्यासाठी दररोज कडलुंडी नदी ओलांडतात. गेल्या २० वर्षांत अब्दुल एकदाही शाळेत उशिरा आलेला नाही आणि या वर्षांत त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. मुलांना शिकवण्यातील त्यांच्या समर्पणामुळे आणि कठोर परिश्रमामुळे ते विद्यार्थ्यांसाठी त्यांचे एक हिरो आणि प्रेरणास्थान बनले आहेत. आजही अब्दुल मलिक त्यांची पुस्तके, कपडे, बूट आणि इतर आवश्यक वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतात आणि रबर टायरच्या मदतीने कडलुंडी नदी पोहत शाळेत जातात.
द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, १२ किमी प्रवास करण्यासाठी बसेसना ३ तास लागतात. या वाहतुकीच्या साधनावर अवलंबून राहण्याऐवजी, पोहत शाळेत जाणे ते अधिक पसंत करतील. ते म्हणाला की, नदी ओलांडून शाळेत पोहोचण्यासाठी त्याला फक्त १५-३० मिनिटे लागतात. शाळेतील विद्यार्थी त्याला प्रेमाने ‘ट्यूब मास्टर’ म्हणतात. ही टायर ट्यूब त्याला नदीच्या प्रवाहात टिकून राहण्यास मदत करते.
🇮🇳🌊🧑🏽🏫🫡
Ha nuotato per un chilometro ogni mattina per più di 20 anni pur di non saltare neanche un giorno di lezione.
Abdul Malik, un devoto professore di matematica in India, ha deciso di sfidare la geografia e il tempo: invece di prendere un autobus che avrebbe impiegato tre… pic.twitter.com/WWQVAJ9lcn— Roberto Avventura (@RobertoAvventu2) May 30, 2025
नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम
याशिवाय अब्दुल मलिक पर्यावरण संरक्षणासाठीही काम करतात. अब्दुल विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे तसेच प्रकृतीचा सन्मान करायला शिकवतात. अनेक वर्षांपासून ते नदी सफाई अभियानाचे नेतृत्व करत आहेत. या मोहिमेअंतर्गत ते त्यांच्या विद्यार्थ्यांसह कडलुंडी नदी स्वच्छ करतो. केरळ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी ही मोहीम सुरू केली. त्यात म्हटले होते की कडलुंडी नदीतील प्रदूषण वाढत आहे. यासोबतच अब्दुल पाचवीच्या वरच्या विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षणही देत आहेत, ज्यामुळे त्यांची पाणीप्रतीची भीती दूर होईल.