Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! नोट वाचताच सगळ्यांची हसून पुरेवाट

Viral Video: ऑनलाइन जेवणाची ऑर्डर देताना एका महिलेने केलेली भन्नाट मागणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पायल नावाच्या महिलेने दोन प्लेट छोले भटुरे ऑर्डर करताना रेस्टॉरंटला छोले इतके तिखट बनवण्याची विनंती केली की ते तिच्या सासूला खाता येऊ नयेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 23, 2026 | 12:55 PM
Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: छोलेच्या बिलावर सुनेची भन्नाट कमेंट! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • छोले भटुऱ्यांच्या ऑर्डरवर महिलेची मजेशीर मागणी
  • सासूसाठी छोले मुद्दाम तिखट करण्याची केली विनंती
  • बिलावरील नोट सोशल मीडियावर व्हायरल
Chole Bhature Viral News: ऑनलाइन जेवण मागवताना आपण आपल्या आवडीनुसार, अनेक सूचना देतो. कधी कुणाला तिखट कमी हवं असतं, कुणाला कांदा नको असतो, तर कुणी पदार्थासोबत जास्त सॉस किंवा रायता मागतं. पण एका महिलेने जेवणाची ऑर्डर देताना केलेली मागणी सध्या सोशल मीडियावर चर्चेंचा विषय बनली आहे. तिची सूचना पाहून रेस्टॉरंटमधील कर्माचाऱ्यांनाही हसू आलं परंतू ही टीप्पणी सोशलमीडियावर व्हायरल होते. ही ऑर्डर जरी छोले भुटरेची असली तरी त्या बिलावर असलेला संदेश भरपूर मजेशीर आहे.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना छोले भटुऱ्यांच्या ऑर्डरशी संबंधित आहे. एका महिलेने दोन प्लेट छोले भटुरे मागवले. ऑर्डरची किंमत १८० रुपये होती. ऑर्डर देणाऱ्या महिलेचं नाव पायल असल्याचं बिलावरून दिसतं. तिने रेस्टॉरंटला एक खास विनंती केली होती. तिचं म्हणणं होतं की छोले इतके तिखट बनवावेत की तिच्या सासूला ते खाता येऊ नयेत. Viral Video:

एवढ्यावरच ती थांबली नाही. आपण नेहमी याच ठिकाणाहून छोले भटुरे मागवतो, असंही तिने रेस्टॉरंटला सांगितलं. म्हणजे आपली मागणी यावेळी नक्की पूर्ण व्हावी, यासाठी तिने आपला ‘जुना ग्राहक’ असल्याची आठवणही करून दिली. ही छोटीशी सूचना इंटरनेटवर पोहोचली आणि त्यानंतर लोकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सासू-सुनेच्या नात्यातील नेहमीच्या गंमतीला या महिलेने जेवणाच्या ऑर्डरसोबत जोडल्यामुळे हा किस्सा लगेच चर्चेत आला.

एक प्लेट सासूसाठी, दुसरी स्वतःसाठी?

सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे अंदाज लावले. काही जणांच्या मते, सुनेला स्वतःचे छोले भटुरे शांतपणे खायचे होते. त्यामुळे सासूने त्यात वाटा मागू नये, यासाठी तिने थेट रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरापर्यंत आपली योजना पोहोचवली. एका अर्थाने पाहिलं तर घरातील छोट्या कुरबुरीवर काढलेला हा भन्नाट उपाय म्हणावा लागेल. अर्थात, ही गोष्ट खरंच गंभीर होती की केवळ गंमत म्हणून लिहिलेली सूचना होती, हे स्पष्ट नाही. पण त्या एका वाक्याने मात्र इंटरनेटवर चांगलाच हशा पिकवला आहे.

नेटकऱ्यांनीही घेतली मजा

फोटो व्हायरल झाल्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. काहींनी या सुनेच्या कल्पकतेचं कौतुक केलं, तर काहींनी तिच्या प्लॅनवर विनोद केले. एका यूजरने म्हटलं की, सासूला जेवणापासून दूर ठेवण्यासाठी यापेक्षा वेगळा मार्ग शोधणं कठीण आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने मजेत म्हटलं की, ही ऑर्डर पाहून स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीलाच आधी विचार पडला असेल की छोले तिखट करायचे की घरातील वादात मध्यस्थी करायची. अशा अनेक मजेशीर प्रतिक्रियांमुळे पोस्ट आणखी लोकांपर्यंत पोहोचली.

LKGच्या चिमुकल्याला शिक्षकाने मारली थप्पड; हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू; Video Viral

आजकाल सोशल मीडियावर रोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात. काही गंभीर असतात, काही आश्चर्यचकित करणारे असतात, तर काही नुसतंच हसवून जातात. हा किस्साही त्याच प्रकारातला आहे. फक्त १८० रुपयांची ऑर्डर, त्यावर लिहिलेली एक छोटीशी सूचना आणि त्यातून तयार झालेला एवढा मोठा विनोद!

राष्ट्रीय प्राण्याने राष्ट्रीय पक्ष्याची केली शिकार, कॅमेऱ्यात कैद झालं दुर्मिळ दृश्य; Video Viral

सासू-सुनेच्या नात्यातील गंमती अनेकदा घरापुरत्याच राहतात. पण या प्रकरणात एका छोट्या ऑर्डर नोटमुळे तीच गंमत सोशल मीडियावर पोहोचली. आता लोकांना त्या छोले भटुऱ्यांपेक्षा या विचित्र मागणीचीच जास्त चर्चा आहे. शेवटी, जेवण कितीही साधं असलं तरी त्यासोबतची गोष्ट भन्नाट असेल, तर ती इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी फार वेळ लागत नाही.

Web Title: Funny chole bhature order goes viral after woman leaves hilarious note for restaurant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • funny post
  • funny viral video
  • viral video

संबंधित बातम्या

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल
1

Monkey Attacks Woman in Vadodara : सोसायटीत घुसलं अन् महिलेवर तुटून पडलं! माकडाच्या हल्ल्याचा VIDEO व्हायरल

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल
2

Instagram Viral Video : एका सेकंदाचा उशीर अन् मांजराचा जीव गेला असता; तरुणाच्या धाडसाचा VIDEO व्हायरल

Panda Viral Video : चिमुकली पडली थेट पांडाच्या पिंजऱ्यात! पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क,व्हिडिओ  व्हायरल
3

Panda Viral Video : चिमुकली पडली थेट पांडाच्या पिंजऱ्यात! पुढे जे घडलं ते पाहून सर्वच थक्क,व्हिडिओ व्हायरल

RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या
4

RBI Compensation Rules : ATM मधून पैसे निघाले नाहीत? खात्यातून रक्कम कट झाली, RBI चा नियम जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.