
Funny video the name of slipper brand will make you laugh video goes viral
सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीने ऑनलाइन चप्पल मागवली होती. पण त्याचा ब्रॅंड पाहून तरुणी हैराण झाली आहे. हसून हसून ती लोट पोट झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चप्पलीच्या कंपनीचे नाव ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरुणी सांगते की, तिने ऑनलाइन चप्पल ऑर्डर केली होती. चप्पल चांगली आली पण त्याचे नाव पाहून ती हैराण झाली. या ब्रॅंडचे नाव ‘भैस की आंख’ असे आहे.
व्हायरल व्हिडिओ
What a brand 🤣 pic.twitter.com/YEaoWIUjKv — Chetan Singh Rathore (@Ajatshatru_28) October 21, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ajatshatru_28 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, माझी भैस की आंक चप्पस हरवली असे म्हटले आहे, तर दुसऱ्या युजरने आजकाल लोक काय करतील सांगता येत नाही असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने कदाचित त्याने म्हशीसाठी बनवली असेल ती चप्पल असे म्हटले आहे, तर काहींनी या ब्रॅंडचे नाव गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दर्ज झाले पाहिजे असे म्हटले आहे. तसेच अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.