Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत पत्रकारांनी शहबाज शरीफ यांना हाफिज सईद आणि दहशतवादाबद्दल प्रश्न विचारले. दरम्यान, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरून पाकिस्तानला लक्ष्य केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 25, 2026 | 02:25 PM
Shehbaz Sharif UNGA Video Hafiz Saeed Terrorist Question

Shehbaz Sharif UNGA Video Hafiz Saeed Terrorist Question

Follow Us
Follow Us:
  • UNGA मध्ये फजीहत
  • व्हिडिओ व्हायरल
  • भारताचा सणसणीत लगाम

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सध्या संयुक्त राष्ट्र महासभेचे (UNGA) ८१ वे अधिवेशन अत्यंत महत्त्वाच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडत आहे. या उच्चस्तरीय जागतिक बैठकीदरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाबाबतचा दुटप्पी चेहरा आणि गुप्त अजेंडा पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर उघडा पडला आहे. गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी दहशतवाद आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याच्यावर उघडपणे प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नांचे उत्तर देण्याचे धाडस न दाखवता शहबाज शरीफ मौन बाळगून वेगाने पुढे निघून गेले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून जगभरातून पाकिस्तानवर टीकेची झोड उठत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करत असताना तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी थेट शहबाज शरीफ यांच्या दिशेने प्रश्न डागला की, “पंतप्रधान महोदय, पाकिस्तान दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणे कधी थांबवणार?” या थेट आणि तीक्ष्ण प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शरीफ यांनी प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले आणि ते वेगाने इमारतीच्या आत निघून गेले. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. जेव्हा ते महासभेतील कामकाज आटोपून बाहेर पडले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना पुन्हा गाठले आणि विचारले, “लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान कधी खटला चालवणार आणि कारवाई करणार?” दुसऱ्यांदा हाफिज सईदचे नाव ऐकताच शरीफ यांनी पुन्हा एकदा मान खाली घालून उत्तर देणे टाळले आणि तेथून पळ काढला. त्यांच्या या पलायनवादी भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रचंड फजीहत झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PTI Protest : इस्लामाबादमध्ये होणार अंतर्गत महायुद्ध! आसिम मुनीर यांनी उभ्या केल्या कंटेनरच्या भिंती; इम्रान समर्थक बुलडोझरसह सज्ज

UNHRC मध्ये भारतीय मुत्सद्यांचा पाकिस्तानवर जोरदार प्रहार

संयुक्त राष्ट्र महासभेतील या मानहानीच्या अवघ्या एक दिवसाआधीच, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताने पाकिस्तानचा बुरखा टप्प्याटप्प्याने फाडला होता. जिनेव्हा येथील परिषदेत बोलताना भारतीय राजनयिक क्षितिज त्यागी यांनी प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा (Right of Reply) प्रभावीपणे वापर करत पाकिस्तानच्या दिशाभूल करणाऱ्या भारतविरोधी अजेंड्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानने सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालणे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करणे थांबवावे, तसेच भारतविरोधी गरळ ओकण्याऐवजी स्वतःच्या कर्जबाजारी आणि कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे.

#WATCH न्यूयॉर्क, US: UN हेडक्वार्टर से निकलते समय ANI ने पाकिस्तानी प्रधानमंत्री शहबाज़ शरीफ़ से फिर पूछा, “आप लश्कर-ए-तैयबा (LeT) चीफ हाफ़िज़ सईद पर कब मुक़दमा चलाएंगे?” पाकिस्तानी PM ने जवाब देने से इनकार कर दिया। pic.twitter.com/PtvmjHYYaM — ANI_HindiNews (@AHindinews) September 24, 2026

credit – social media and Twitter

भारतीय मुत्सद्दी क्षितिज त्यागी यांनी पाकिस्तानचे प्राधान्यक्रम पूर्णपणे चुकीचे असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती अत्यंत बिकट असून देशातील नागरिक महागाई आणि अन्नाच्या तुटवड्याने त्रस्त आहेत, परंतु तरीही तेथील सरकार भारतविरोधी प्रचार करण्यातच आपली ऊर्जा वाया घालवत आहे. दहशतवाद्यांना सरकारी संरक्षण देणे आणि आंतरराष्ट्रीय निधीचा गैरवापर करणे ही पाकिस्तानची सवय बनली असून यामुळेच आज तो देश जगात एकाकी पडला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) अमानुष दडपशाहीचा पर्दाफाश

भारतीय राजनयिकाने यावेळी पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या अनन्वित अत्याचारांचा आणि दडपशाहीचा जागतिक मंचावर पर्दाफाश केला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असून तेथील आंदोलकांवर पाकिस्तानी प्रशासन कसा प्राणघातक हिंसाचार करत आहे, याचे वास्तव भारताने जगासमोर मांडले. तेथील स्थानिक जनतेला आवश्यक अन्नधान्य, इंधन, औषधे आणि वीज पुरवठ्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असून जनतेचा आवाज

Web Title: Shehbaz sharif unga video viral ignores hafiz saeed question india slams pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Shahbaz Sharif
  • United Nations Security Council
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
1

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला
3

Benjamin Netanyahu UN : ‘गाझामधील नरसंहाराचा आरोप म्हणजे शतकातील सर्वात मोठे खोटे’; संयुक्त राष्ट्रांत नेतान्याहूंचा रोखठोक हल्ला

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
4

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.