(फोटो सौजन्य: Instagram)
‘लाइफ ऑफ पाय’ हा एक सुप्रसिद्ध चित्रपट आहे ज्यात ‘पाय’ नावाचा मुलगा जहाजाच्या अपघातानंतर एका धोकादायक वाघासोबत लाइफबोटवर अडकतो आणि इथूनच सुरु होतो त्याच्या जीवनाचा प्रवास. असेच काहीसे दृश्य आता सोशल मीडियावर खऱ्या आयुष्यात घडून आल्याचे दिसून आले. वाघ पाण्यात पडला, त्याच्यासमोर नाखवा बोट घेऊन उभाही दिसतो पण या वाघाला वाचवायचं की नाही हा प्रश्न त्याच्या मनात संभ्रम निर्माण करतो. वाघ हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तो अनेक प्राण्यांची शिकार करतो. वाघ फक्त प्राण्यांचीच नाही तर मानवाचीही शिकार करू शकतो अशात त्याच्या जवळ जाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.
व्हिडिओमध्ये वाघ पाण्यात बुडताना दिसतो. त्याच्या समोर नाखवा बोट घेऊन त्याला बुडताना पाहत तर असतो पण त्याला वाचवू की नको असा प्रश्न त्याच्या मनात भेडसावत राहतो. वाघाला वाचवले तर त्याचे प्राण वाचेल पण वाघाला वाचवल्यास वाघ त्याची शिकारही करू शकतो. अशात त्याला वाचवणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं! व्हिडिओमध्ये मात्र व्यक्ती पुढच्याच क्षणी एका काठीने वाघाला आपल्या बोटीजवळ खेचताना दिसून येतो. तो त्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतो खरा पण वाघ लगेचच त्याला फुंकारतो त्यानंतर व्यक्ती आपली काठी त्याच्यापासून दूर करतो. व्हिडिओमध्ये व्यक्ती वाघाचा जीव वाचवतो की नाही ते स्पष्ट झाले नाही पण हा व्हिडिओ मात्र आता सर्वांना ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाची आठवण करून देत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @delhi_ka_ladka_7_4_2025 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खऱ्या आयुष्यात लाइफ ऑफ पाय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा तू स्वतःचा जीव वाचव” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटत वाघाचा जीव वाचवायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.