
क्या से क्या हो गया! काकांच्या अंगातला रेहमान किडा जागला अन् त्यांनी असं काही केलं की सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आलं; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर अलीकडे एका काकांचा व्हिडिओ फार व्हायरल होत आहे. यात ते काही खुरापती करताना दिसून आले ज्यात त्यांचीच फजिती झाली. काकांची फजिती पाहून युजर्सही म्हणाले की, “कदाचित काकांना यमराजांना भेटायचं असेल”. व्हिडिओत आपण पाहू शकता, यात एका मोकळ्या फुलांच्या बागेत झाडाच्या एका पातळ खोडावर उभं राहून एक काका बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. खोड इतके पातळ आणि उंच असते की त्याच्या टोकावर काकांना उभं राहता येत नाही आणि परिणामी ते खोडावरून खाली कोसळतात. काकांसोबतही त्यांच्या शहाणपणाही जमिनीवर येऊन आदळतो जे पाहून युजर्सना हसू अनावर झालं आहे. नको ते करायला जायचं कशाला असं म्हणत आता युजर्स व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
दरम्यान हा व्हिडिओ @Bahujan_Era नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काका स्वर्गात डोकावण्याचा प्रयत्न करत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यालाच म्हणतात संकट स्वतःवर ओढवून घेणे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काकांना यमराजांना भेटायला जायचं होत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.