(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
मध्य प्रदेशातील धार येथील धार्मिक स्थळ भोजशाळेमध्ये वसंत पंचमीच्या दिवशी पूजा आणि नमाज प्रशासनासाठी एक मोठे आव्हान होते, परंतु कडक सुरक्षा व्यवस्थेत संपूर्ण कार्यक्रम शांततेत यशस्वीरित्या पार पडला. दिवसभराच्या कामानंतर पोलिसांनी आनंद साजरा करण्यासाठी गदर चित्रपटातील ‘मैं निकला ओ गद्दी लेके’ गाण्यावर डान्स केला. वसंत पंचमीचा हिंदू सण आणि शुक्रवारची नमाज एकाच दिवशी येत असल्याने, कोणत्याही अनुचित परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत पूजा आणि नमाज करण्यासाठी अंदाजे ८,००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या कडक सुरक्षेतच एक मोठा कार्यक्रम सुरक्षित आणि शांततेत पार पडला.
धार भोजशाला में शांति से पूजा पाठ और नमाज़ संपन्न होने के बाद ड्यूटी पर तैनात पुलिस जवानों ने गदर के गाने पर जमकर डांस करते हुए अपनी खुशी का इजहार किया… pic.twitter.com/DiT6y2OfsL — Dinesh Dangi (@dineshdangi84) January 24, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @dineshdangi84 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं असून पोलिसांचा हा डान्स आता वेगाने शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ आपल्याला दाखवतो की, कठोर कामानंतर अखेर मनाला थोड्या आनंदाची गरज असतेच. वर्दीतही पोलिसांनी आपला आनंद लुटला आणि आपला थकवा उत्साहाने दूर केला. कायद्याची जबाबदारी निभावताना कठोर दिसणारे पोलिसही शेवटी माणूसच आहेत, आणि कर्तव्य पार पडल्यानंतरचा हा आनंद त्यांच्याही मनातील माणुसकी दाखवतो.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






