बाप बाप होता है! विशालकाय शार्कने जिवंत मगरीला चावून चावून खाल्लं; मृत्यूचे नाटक करत होता पण शेवटी जे घडलं...Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. इथे अनेकदा प्राण्यांच्या शिकारीचे दृश्य देखील शेअर केले जाते, जे नेहमीच आपल्याला हादरवून सोडते. आताही शिकारीचा असाच एक थरार व्हायरल झाला आहे ज्यात समुद्रातील शार्क जिवंत मगरीला खाताना दिसून आला. शिकारीचे दृश्य इतके भयानक होते की ते पाहून सर्वांनाच कापरा भरला. ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याने तो शेअर केला आणि बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओत नक्की काय काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
निसर्गाचा नियम खूप कडक आहे. इथे शिकारीही शिकारी बनू शकतो. अलिकडेच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये जंगलाचा राक्षस शार्क माशाचा शिकार झाल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे, यावेळी मगर जिवंत असते पण शार्क इतक्या वेगात त्याची शिकार करते की काही समजेपर्यंत त्याने जीव गमावलेला असतो. व्हिडिओच्या सुरुवातीला, समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर एक मगर उलटा पडलेला दिसतो. तो पूर्णपणे स्थिर आहे, ज्यामुळे तो मृत किंवा बेशुद्ध असल्यासारखे दिसत आहे. त्याचे डोके पाण्याखाली आहे आणि उर्वरित शरीर बाहेर दिसत आहे. तेवढ्यात एका शार्क माशाची नजर मगरीवर पडते आणि वेगाने तो मगरीकडे सरकतो. शार्क वेगाने मगरीकडे वळतो आणि आपल्या जबड्यात पकडून त्याला पाण्यात ओढतो. मगर जीव वाचवण्यासाठी आपले हातपाय हलवते पण शार्क पुढे त्याचे काहीच चालत नाही आणि शेवटी तो मृत्यूला बळी पडतो.
Bull Shark claims a Crocodile pic.twitter.com/AbacyOtaG5
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) May 24, 2025
चंदेरी थाळी, सोनेरी मटण… लग्नात वैष्णवी हगवणेने नवऱ्यासाठी घेतलेला उखाणा चर्चेत; Video Viral
शिकारीचा हा भयानक थरार @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 5 मिलियनहुन अधिकचे व्यूज मिळाले आहेत तर अनेक युजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या शिकारीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ती मगर तिथे नक्की काय करत होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आश्चर्य वाटते की शार्कला वाटले असेल की त्या मगरीची चव चिकनसारखी असेल”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ झोपताना पकडला गेला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.