(फोटो सौजन्य: Instagram)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण जोरदार व्हायरल आणि चर्चेचा विषय ठरत आहे. हुंड्यासारखी कुप्रथा आजही आपल्या समाजात आजही समाजात सुरु आहे आणि याची बळी ठरलेली वैष्णवी हिच्या कहाणीने संपूर्ण महाराष्ट्र्र हादरून गेलं. सासरकारच्यांना ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू देऊनही वैष्णवीचा पैशासाठी छळ केला जात होता. हा छळ फक्त मानसिकच नाही शारीरिकही! अशात या जाचाला कंटाळून अखेर तिने स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला.
माहितीनुसार, वैष्णवीचा नवरा, तिची जाव आणि सासू सासरे असे सर्वच मिळून तिचा छळ करत होते. या प्रकरणावर तपास सुरु असून सोशल मीडियावर मात्र आता या प्रकरणासंबंधीचे अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्याच्या लग्नातील फोटोज, व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पुन्हा शेअर केले जात आहेत जे व्हायरल देखील झाले. अशातच लग्नातील असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असल्यचे दिसून आले आहे. यात वैष्णवी आपल्या लग्नासाठी सजली असून तिला उखाणा घेण्याची विनंती केली जाते. वैष्णवी अजिबात डगमगत नाही हसत हसत उखाणा घेते. तिने यावेळी कोणता उखाणा घेतला? चला जाणून घेऊया.
वैष्णवीचा व्हायरल व्हिडिओ @dj_karmala_9090 नावाच्या इंस्टाग्राम अकाउटंवर शेअर करण्यात आला आहे. यात ती नवऱ्यासाठी सुंदर आणि हटके अंदाजात उखाणा घेताना दिसून आली. वैष्णवी म्हणजे, “चंदेरी थाळी सोनेरी मटण, शशांक रावांना आवडत चिकन आणि मटण”… तिचा हा उखाणा आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती सुंदर होती ताई तू ..त्याची लायकी नव्हती कसा जीवनसाथी निवड केला तू…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती निखळ हास्य आहे…तू कल्पना सुद्धा केली नसणं हे लोक इतके वाईट निघतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावपूर्ण श्रद्धांजली ताई”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.