Girl climbs mobile tower after mother scold her over diwali cleaning video goes viral
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणी थेट मोबाईल टॉवरवर चढली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मिरजापूरमध्ये घडली आहे. आईने तरुणीला दिवळीच्या साफसफावरुन फटकारले होते. यावरुन नाराज होऊन तरुणी मोबाईल टॉवरवर चढली होती. या घटनेमुळे संपूर्ण गावभर गोंधळ उडाला होता.
नेमकं काय घडलं?
दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा आहे. या सणापूर्वी सर्वजण घरात मोठ्या उत्साहाने साफसफाई कराता. आई पासून, वडिलांपर्यंत सगळेजण मिळून घराचा एक एक कोपरा साफ करुन झळकवतात. पण अनेदा काहीजण यामध्ये आळस करतात. अशा वेळी आई आपल्याला रागवते, मारते, आपल्यावर चिडते. असे काहीसे या मिर्जापूरच्या तरुणीसोबत घडले आहे. तरुणीने साफसफाईत मदत न केल्याने तिच्या आईने तिला रागवले होते. यावरुन नाराज होईन तरुणी थेट मोबाई टॉवरवर चढली होती. यामुळे संपूर्ण गावभर गोंधळ उडाला होता. एवढेच नव्हे तर तिने टॉवरवरुन उडी मारण्याचीही धमती दिली होती. ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली होती. सुदैवाने पोलिसांनी तिला समजावून सांगितले आणि सुरक्षितपणे खाली उतरवले. यामुळे कोणतीही गंभीर घटना घडली नाही. पण या घटनेचा व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @sunnobc या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, जेवढ्या वेळ तिने टॉवरवर चढायला घालवला तेवढ्या वेळात साफसफाई झाली असती, तर साफसफाई न करण्यासाठी जीव द्यायला निघाली होती? असा प्रश्न दुसऱ्या एका नेटकऱ्याने केला आहे. तिसऱ्या एकाने आजच्या पिढीला काही काम करायला नको, कष्ट काय असतात हे यांना माहितच नाही असे म्हटले आहे. तर आणखी एकाने पण हिच्यात एवढी हिंमत आली कुठून असे विचारले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
वय तर फक्त एक नंबर! 85 वर्षाच्या आजीने ऋषिकेशमध्ये केलं बंजी जम्पिंग, VIDEO तुफान व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.