
डाएटवर आहे म्हणे… म्हणून पापड नाही थेट धारदार वस्तू! तरुणीने जेवण नाही तर ब्लेड चावून खाल्लं, पाहून सर्वच झाले अवाक्; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण यात पाहू शकता की, यात एक मुलगी तोंडात धारदार ब्लेड पकडून रील बनवत आहे. काही क्षणातच ती तोंडात पकडलेले हे ब्लेड तोंडाच्या आत टाकून खाऊन दाखवते. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा त्रास नसतो . जणू काही हा कुरकुरीत नाश्ता आहे अशाप्रकारे ती ब्लेडला चावून खाते. फ्रेममधील हे दृश्य कोणत्या चमत्काराहून कमी नाही. तरुणीच्या या स्टंटने सर्वांनाच थक्क केलं असून युजर्सने व्हिडिओवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी हा फेक स्टंट असल्यासाचे म्हटले तर काहींनी तरुणी असं करूच कस शकते असे म्हटले.
😭🤡 pic.twitter.com/4vEop0589b — rareindianclips (@rareindianclips) January 23, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “परपेंडीकुलरची बहीण आहे वाटत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिने व्हिडिओ मध्ये कट केला आहे, ब्लेड तोंडात घालून नंतर तिने बाहेर काढले असतील” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असं होऊच शकत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.