Grandma's amazing dance wearing glasses video goes viral
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यत सगळेच अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होतात. आजी-आजोबांचा तर स्वॅगच वेगळा असतो. आत्तापर्यंत असे लाखो व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये वयोवृद्ध लोकं आनंदात डान्स करतात. त्यांच्या या व्हिडिओंवरुन लक्षात घेण्यासारखे आहे की, आनंद साजरा करायला, कलेला वयाची मर्यादा नसते.
सध्या असाच एक आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आजींनी छान तयार होऊन डान्स केला आहे. आजींच्या या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. डान्स करायला वयाची मर्यादा नसते हे या व्हिडिओतून स्पष्ट होते. अगदी भन्नाट डान्स करत लोकांचे मन आजींनी जिकंले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील आवडेल.
आजींचा भन्नाट डान्स
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक आजी साडी नेसलेली दिसत आहे. आजीने मस्त असा चष्मा घातला आहे. तसेच डोक्याला टॉवेलती पगडी बांधली आहे. यानंतर आजी भन्नाट अशा स्टेप्स करत डान्स करत आहेत. त्यांच्या एक वेगळाच स्वॅग दिसून येत आहे. सध्या या व्हिडिओने नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याची माहिती नाही. पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर gsekhar75 या अकाऊंटर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नवीन मॉडेल डान्स असे लिहिले आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारोहून अधिक लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आजी भारीच डान्स केलाय, तर दुसऱ्या एका युजरने आजी त्यांच्या जवानीत स्टेज गाजवले असणार असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केले आहे. आजीचा नादच खुळा असेही एकाने म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, जे आहे त्यात आनंद कसा शोधावा हे आजीकडून शिकावे असेही एका युजरने म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.