
हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
गाझियाबादमध्ये चिकन कॉर्नरवर एका स्वयंपाकीने तंदुरी रोटीवर थुंकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी मुरादनगर शहरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांदगि गाझियाबादमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका स्वयंपाकीला रोटी बनवण्यापूर्वी त्यावर थुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे. मधुबन बापुधाम पोलीस स्टेशन परिसरातील दिल्ली-मेरठ रोडवरील वर्धमान पुरम पोलीस चौकीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या भोजनालयात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
गाजियाबाद में एक चिकन कॉर्नर पर कारीगर द्वारा थूककर रोटी बनाने का मामला सामने आया है। इस घटना का वायरल वीडियो सामने आने पर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने बताया कि आरोपी की पहचान जावेद अंसारी के रूप में हुई है।https://t.co/U0EiP2AFFo#Ghaziabad #ViralVideo pic.twitter.com/Bdl4iT63uj — Praveen Sharma (@MediaMasalaMan) January 9, 2026
पोलिसांच्या मते, काही ग्राहकांनी स्वयंपाकीला पीठ आणि रोट्यांवर थुंकताना पाहिले आणि त्याचे शुट केले. त्यानंतर सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली. नवराष्ट्र डिजीटल या व्हिडिओची पुष्टी करत नाही. कवीनगरचे एसीपी सूर्यबली मौर्य यांनी सांगितले की, “चिकन पॉइंट” नावाचे हे भोजनालय वसीम नावाच्या व्यक्तीचे आहे. घटनेच्या वेळी मालक दुकानात उपस्थित होता का याचा तपास पोलीस करत आहेत.
एसीपी म्हणाले की, पोलीस भोजनालयाच्या परवान्याच्या वैधतेची आणि घटनेतील मालकाची भूमिका तपासत आहेत. त्यांनी असेही सांगितले की, भोजनालयाच्या मालकाविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाईसाठी अन्न सुरक्षा आणि आरोग्य विभागांना अहवाल पाठवण्यात आला आहे.