पाण्याच्या राक्षसांनी केला गेम! संधी साधत शार्कच्या ग्रुपने डायव्हरवर हल्ला केला अन्... थरारक दृश्यांनी भरलेला Video Viral
प्रत्येक जिवाने पृथ्वीचा काही भाग आपल्या नावी केला आहे, जिथे फक्त त्यांचं राज्य चालतं. जस की शहरात माणसांचं चालतं, जंगलात प्राण्यांचं तर पाण्यात माशांचं… अशात आपण त्यांच्या राज्यात गेलो तर आपला जीव धोक्यात गेला इतकं मनाशी पक्क करायचं! माणूस जसजसा प्रगत होत चालला आहे त्याची जगाला आणखीन जवळून जाणून घेण्याची जिज्ञासाही तितक्याच वेगाने वाढली आहे आणि याच प्रयत्नात माणूस जंगलात आणि खोल पाण्यातील विश्व पाहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून इथे जात असतो. तंत्रज्ञानाच्या आधारे आता आपण खोल पाण्याच्या आताही श्वास घेऊन तिथले जग पाहू शकतो पण असे करताना त्यात धोकाही तितकाच मोठा असतो. पाण्यात अनेक धोकादायक शिकारी असतात जे आपला जीव घेऊ शकतात आणि अशीच एक घटना एका डायव्हरसोबत घडून आली आहे ज्यात पाण्यात जाताच त्याला शार्कच्या एका ग्रुपने घेरत त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात नक्की काय घडले याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय घडलं व्हिडिओत?
फ्लोरिडाच्या हॉलिवूड बीचवर हा प्रकार घडून आला. डायव्हिंग करताना गोताखोरांचा एक गट शार्कच्या एका गटात अडकला. त्यानंतर शार्कने एका माणसावर हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की यात तो गंभीर जखमी झाला. शार्कच्या चाव्यामुळे त्याच्या हातांना खोल दुखापत झाली आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. त्या गोताखोराचे वय सुमारे 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर, ओशन ड्राइव्हजवळ हॉलिवूड फायर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मदत पोहोचली तेव्हा जखमी माणूस आधीच पाण्यातून बाहेर आला होता. त्याला घटनास्थळी रुग्णालयात नेण्यात आले. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एका डायव्हरच्या हातात दोरीसारखे काहीतरी आहे जे शार्क आपल्या तोंडात धरून पळू लागतो. ज्यामुळे तो माणूस तोंडातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शार्क त्या माणसावर हल्ला करतो. तो माणूस जखमी होतो आणि शार्क दोरी सोडून पळून जातो.
मराठी गाण्याचा डंका आता जर्मनीत; प्राइड परेडमध्ये वाजलं ‘तांबडी-चामडी’, Video Viral
या घटनेचा व्हिडिओ @abcnews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो त्याला मदत करत होता आणि शार्क घाबरला कारण त्याला दुखापत झाली होती. हल्ला नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर प्राणी घाबरला असेल आणि स्वतःचा बचाव करत असेल तर तो हल्ला आहे का” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हल्ला नक्की कधी झाला हे मला अजून समजलं नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.