Guy celebrate divorce in unique way video goes viral
Divorce Celebration Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण, डान्स यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अलीकडे लग्नानंतर घटस्फोट झाल्यावर सेलिब्रेशन करणे आता सामान्य होत चालले आहे. पूर्वी फक्त गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसोबत ब्रेकझाल्यावर पार्टी केली जात होती. आता लग्न झालेले लोक सुद्धा घटस्फोट झाला तर आनंद साजरा करत आहे.
सध्या एका तरुणाचा घटस्फोट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये तरुणाने घटस्फोट घेतल्यानंतर काय काय केले याचे चित्रण केले आहे. तरुणाने घटस्फोट दिल्यानंतर दुधाने अंघोळ केली आहे. त्यानंतर छान लग्नाची शेरवानी घालून तयार झाला आहे. तसेच त्याने केकही कट केला आहे. केकवर Happy Divorce असे लिहिले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिल्यानुसार, त्याने कदाचित १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख कॅश दिले आहेत. तरुणाने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, दु:खी राहण्याची गरज नाही. स्वत:ला सेलिब्रेट करा, डिप्रेशनमध्ये राहून नका. मी सिंगल आहे, आनंदी आहे, मुक्त आहे. आता हे माझे जीवन असून माझ्या नियमांप्रमाणे मी चालणार असे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @iamdkbiradar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. पण अनेकांनी यावर टीका केला आहे. एका युजरने म्हटले आहे की, चला आता पुढच्या मुलीचे आयुष्य खरबा करुया, त्याच्या आईने त्याला दुधाने अंघोळ घातली आहे, तर दुसऱ्या एका युजरने दुसऱ्यांदा लग्न करुन नकोस तुझी आई आहे बाळासारखी काळजी घ्यायला असे म्हटले आहे. अशी टीकात्मक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.