Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरेच्चा हा तर जलपरा! तोंड माणसाचं नि धड सापाचं, Viral Video पाहून लोक गोंधळात म्हणाले, “हा तर नागीण फ्रॉम Meesho”

Jalpara Spotted Video: आजवर जलपरीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहिले असतील मात्र तुम्ही कधी जलपऱ्याला पाहिले आहे का? व्हिडिओतील धक्कादायक दृश्ये पाहून सर्वच कोड्यात पडले असून काहींनी याला खरे मानले आहे तर काहींनी...

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2025 | 08:27 AM
अरेच्चा हा तर जलपरा! तोंड माणसाचं नि धड सापाचं, Viral Video पाहून लोक गोंधळात म्हणाले, "हा तर नागीण फ्रॉम Meesho"

अरेच्चा हा तर जलपरा! तोंड माणसाचं नि धड सापाचं, Viral Video पाहून लोक गोंधळात म्हणाले, "हा तर नागीण फ्रॉम Meesho"

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे आणि अजब-गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्याला हसवण्याचा काम करतात. यातील काही दृश्ये तर अशी असतात की ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. आताही सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच कोड्यात पाडलं. हे दृश्य इतके अनोखे आहे की क्वचितच असे हे दृश्य तुम्ही कधी पाहिले असेल. आजवर तुम्ही जलपरीच्या अनेक कथा ऐकल्या असतील किंवा टीव्हीवर याचे दृश्य पाहिले असेल. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या गेल्या आहेत. जेव्हाही हे दृश्य समोर येते तेव्हा ते लोकांना थक्क केल्याशिवाय राहत नाही.

तलावाच्या बाहेर येताच पाण्याच्या राक्षसावर तुटून पडल्या सिंहीणी; ओरबाडून ओरबाडून खाल्लं अन् हल्ल्याचा थरारक Video Viral

जलपरी ही मुळातच एक पाण्यातील जीव असल्याचे सांगितले जाते. यात त्याचे शरीर महिलांसारखे असते मात्र कमरेपासून खालचा भाग हा माशासारखा असतो. सोप्या भाषेत जलपरीचे अर्धे शरीर हे माणसांसारखे असते आणि अर्धे शरीर हे माशांप्रमाणे दिसते. आजवर जलपरीचे अनेक फोटो किंवा व्हिडिओ आपण पाहिले असतील मात्र वास्तविक, जलपरा नावाच्या जीवाला तुम्ही कधी पाहिले आहे का? हे अद्भुत आणि अनोखे दृश्य सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील अजब-गजब दृश्ये लोकांना कोड्यात पाडत असून हे लोक आता या व्हिडिओने चांगलीच गोंधळात पडली आहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती खाली जमिनीवर उलटा पडून झोपल्याचे दृश्य दिसून येत आहे. मुख्य म्हणजे यात त्याचे डोकं माणसांप्रमाणे तर कमरेखालील शरीर हे एका अजगाराप्रमाणे लांबलचक असल्याचे दिसून आले. माणूस आपले डोकं मागे फिरवत आपल्या पसरलेल्या शरीराकडे पाहत राहतो, यावेळी त्याच्या डोक्यावरही एक छोटा साप चिपकून बसलेला असतो. हे दृश्य इतके भयाण आणि अजब असते की ते पाहण्यासाठी तिथे लोकांची गर्दी जमा होते. व्यक्तीचे शरीर इतके जबरदस्त आणि खरेखुरे दिसत असते की लोक यावर विश्वास ठेवावा की नाही या विचाराने गोंधळात पडतात. मात्र या अकाउंटवरील इतर व्हिडिओ पाहून असे दिसून आले की हा व्हिडिओ खरा नसून तो फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. खरंतर व्यक्तीने कमरेपासून पायांपर्यंत एक कपडा लावलेला असतो ज्यात तो आपले पाय लपवतो आणि यातच त्याच्या पाळलेल्या अजगराचे तोंड लपलेले असते. व्यक्ती आपले पाय आणि अजगराचे तोंड लपवून स्वतःला जलपरा दाखवण्याचे प्रयत्न करतो. व्हिडिओत तुम्ही निरखून पाहिले तर तुम्हाला ते स्पष्ट दिसून येईल.

भाभीजीचा खतरनाक डान्स पाहून म्हशीला पण वाटली लाज; पाहता क्षणी नजर फिरवली अन् Viral Video पाहून हसूच अनावर होईल

व्हिडिओतील हे दृश्य जरी खरे नसले तरी याने युजर्सना नक्कीच मोठा धक्का दिला आहे. ज्याने व्हिडिओचे सत्य समजले तो खळखळून हसला आणि ज्याला सत्य नाही समजले तो आश्चर्याच्या धक्क्याने कोड्यात पडून राहिला. हा व्हिडिओ @phriie_putranaja नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो युजर्सने पाहिले असून हजारोंनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नागीण फ्रॉम मिषो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एडिटिंग चांगली केली आहे”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जय नागदेवता”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Half man and half python shocking video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • funny viral video
  • shocking video viral
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral
1

गज्जू दादाच्या समोर तर रोनाल्डो पण फेल आहे…! जबरदस्त किक मारत हत्तींनी खुल्या मैदानात खेळला फुटबॉल; खेळाचा मजेदार Video Viral

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL
2

पानीपतचे तिसरे महायुद्ध…! शेतात दोन महिलांमध्ये जोरदार भांडण; एकमेकींना मिठी मारुन, मातीत लोळवलं अन्…, VIDEO VIRAL

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
3

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
4

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.