(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ नेहमीच हास्याने भरलेले असतात. अलीकडे असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला म्हशीसोबत डान्स करताना दिसून आली. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक नेहमीच काही ना नाही विचित्र प्रकार करताना दिसतात मात्र यावेळी महिलेने चक्क म्हशींसोबत डान्स करण्याचा पर्याय निवडला. व्हिडिओत महिला अशाप्रकारे म्हशीला चिपकून डान्स करत होती की ते दृश्य पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले. चला व्हिडिओत काय घडले याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक महिला साडी घालून डोक्यावर घुंघट घेऊन डान्स करताना दिसून येते. मात्र व्हिडिओत ती एकटी नाही तर तिच्यासोबत एक म्हैस देखील तिथे असल्याचे दिसून येते. महिला म्हशीला चिपकते आणि मग आनंदात डान्स करू लागते. तिचा हा डान्स फक्त युजर्सचेच नाही तर त्या म्हशीचेही लक्ष वेधून घेतो. म्हैस काही करत नाही पण डोळे फिरवत फिरवत महिलेचा डान्स पाहत राहते. म्हशीला चिपकत महिलेने केलेला हा डान्स आता आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @desijaatni3101 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा, तू कुठे पोहोचला आहेस? जग या पृथ्वीवर कहर करत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नाचता नाचत म्हशीच्या पायाखाली चिरडून जाल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोक प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.