(फोटो सौजन्य: Instagram)
प्राण्यांचे आयुष्य माणसाच्या जीवनाहून बरेच वेगळे आणि अनोखे असते. त्यांना रोज जगण्यासाठी आपल्या मृत्यूशी झुंझ द्यावी लागते, कारण जंगलाचा नियम आहे, इथे एकाच्या मृत्यूवर दुसऱ्याचे आयुष्य अवलंबून असते. अशात प्राण्यांमधील शिकार फार सामान्य गोष्ट आहे, त्यांच्या शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर शेअर केले जातात. या व्हिडिओमध्ये शिकारीचे अनेक थरारक दृश्ये दिसून येतात जे आपल्या अंगावर काटा आणतील. आताही काही असेच घडले आहे इंटरनेटवर सध्या पाण्याचा राक्षस म्हणजे मगरीसोबत जंगलाच्या राण्या भिडल्याचे दृश्य दिसून आले. हा हल्ला फारच मनोरंजक ठरला आणि याचे थरार दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की काही सिंहीणींनी मिळून एका मगरीवर जीवघेणा हल्ला केला आहे. मात्र यात मगरही हार मानण्यास तयार नाही. ती आपला जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. जेव्हा एक सिंहीण त्याच्यावर झडप घालते तेव्हा ती वेगाने प्रत्युत्तर देते. पण नंतर दुसरी आणि तिसरी सिंहीण त्याच्यावर हल्ला करते. हा संघर्ष काही मिनिटे सुरू राहतो, ज्यामध्ये मगर वारंवार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. कधी ती जमिनीवर लोळते तर कधी तोंड उघडून घाबरवण्याचा प्रयत्न करते, मात्र सिंहिणींची ताकद अफाट असते ज्यामुळे त्यांच्यावर मगरीचे फार काही चालत नाही. सिंहीणी मिळून एका मागून एक हल्ला करतात आंणि मगरीला दातांनी चावट तिची शिकार करू पाहतात. आता या लढाईत कोण विजयी ठरतं हे मात्र या व्हिडिओत स्पष्ट करण्यात आले नाही मात्र सिंहिणींची संख्या पाहता मगरीची त्यांच्यापासून सुटका झाली असेल असे वाटत नाही.
पाण्याचा राक्षस आणि जंगलच्या राण्या यांच्यातील हे थरार युद्ध आता सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधत आहे. याचा व्हिडिओ @wildlife_bigcats नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या लढतीचे कौतुक केले आहे तर काहींनी व्हिडिओतील या दृश्यांना AI तंत्रज्ञानाने तयार केल्याचे मानले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.