खाली डोकं, वर पाय...! रीलसाठी दलदलीत उतरला अन् उडी मारताच असा अडकला की... पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; Video Viral
सध्या रीलचा ट्रेंड एवढा वाढला आहे लोक त्यासाठी नको नको ते सर्वच करू लागले आहेत. स्वतःच्या जिवाचीची पर्वा न करता वाटेल त्या ठिकाणी लोक रील बनवू पाहतात आणि आपल्या जीव धोक्यात टाकतात. कोणी ट्रेनमध्ये रील बनवताना दिसतं तर कोणी बसमध्ये, काहीजण तर चालू बाईकवरही रील बनवणं सोडत नाही. रिलच्या या नादापायी अनेकदा अपघाताच्या घटना घडून येतात. काहींनी तर यामुळे आपले जीवही गमावले आहेत मात्र तरीही लोक काय सुधारण्याचे नाव घेत नाही. रिलचा आणखीन एक जीवघेणा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात रील बनवण्यासाठी तरुणाने दलदलीत उडी मारल्याचे दिसून येते त्यानंतर त्याचे शरीर त्या दलदलीत अडकून जाते. पुढे काय होते ते चला व्हिडिओतून जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
दलदलीत भाग आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. पाणी आणि चिखलाने भरलेल्या या भागात एकदा का कोणी गेला की त्यातून बाहेर पडणे कठीण असते. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक तरुण पळत पळत एका दलदलीत उडी मारताना दिसून येत आहे. यावेळी त्याचा मित्र त्याचा व्हिडिओ शूट करत असतो. मुलगा धावत पळत दलदलीच्या काठावर येतो आणि दुसऱ्या मुलाच्या खांद्यावरून थेट त्यात उडी मारतो. उडी मारताच त्याचे अर्धे शरीर दलदलीच्या आत जाते तर अर्धे शरीर बाहेर राहते. पाय वर आणि डोकं खाली अशी परिस्थिती व्हिडिओत दिसते. यानंतर तरुण त्यातून बाहेर निघू पाहतो मात्र त्याचे अर्धे शरीर चिखलात रुतून बसते. यावेळी त्याला श्वास घेणंही अवघड होत ज्यानंतर तो तिथून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू लागतो. अखेर व्हिडिओच्या शेवटी तो कसा बसा यातून बाहेर निघाल्याचे दिसून येते. तरुणाचा हा जीवघेणा प्रकार आता युजर्सना आश्चर्यचकित करत आहे. लोक गंभीर टीका करत तरुणाच्या या जीवघेण्या स्टंट आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
पांचट Jokes : मुलीची आवड की आईचा स्वार्थीपणा? वाचाल तर हसून हसून जमिनीवर लोटपोट व्हाल
दरम्यान तरुणाचा हा स्टंट @rdx_rahish_kumar100k नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, एवढा धोका पत्करू नकोस, मी तुला वेदना होताना पाहू शकलो नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, मी तर बघूनच घाबरलो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अजून थोडा वेळ लागला असता तर मेला असता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.