(फोटो सौजन्य: X)
उंट हा एक असा प्राणी आहे जो राजस्थानच्या रखरखत्या वाळवंटात आढळला जातो. हा एक असा प्राणी आहे जो तुम्हाला फक्त वाळवंटातच आढळून येईल. उंट हे एक असे प्राणी आहे जे बराच काळापर्यंत आपल्या पोटात पाणी साठवून ठेवू शकतात ज्यामुळे वाळवंटात ते अधिकतर आढळून येतात. त्यांना वाळवंटाचा जहाज म्हणूनही संबोधले जाते. वाळवंटी प्रदेश जिथे पाण्याची नेहमीच कमतरता असते अशा जागी वाढलेला उंट जेव्हा पाण्याच्या अथांग समुद्र पाहतो तेव्हा काय होईल याची कल्पना करा. वास्तविक, वाळवंटाच्या या जहाजाने पहिल्यांदाच समुद्राला भेट दिल्याचे दिसून आले. ज्याने जीवनभर फक्त आणि फक्त वाळू पाहिली तो जेव्हा पाण्याने भरलेला समुद्र पाहतो तेव्हा त्याच्या आनंदाला थारा राहत नाही. यानंतर उंट व्हिडिओत जे करतो ते पाहण्याजोगे आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक उंट समुद्रकिनारी पाण्याची मजा लुटताना दिसून येत आहे. उंट ज्याने कधीही इतकं पाणी पाहिलं नाही तो जेव्हा पहिल्यांदा पाण्याने भरलेला समुद्र पाहतो तेव्हा त्याच्या आनंदाला सीमाच उरत नाही. पाणी पाहून तो इतका उत्साहित होतो की थेट पाण्याच्या जातो आणि आपले संपूर्ण शरीर पाण्यात भिजवून पाण्याची मजा लुटायला सुरुवात करतो. व्हिडिओत आपण पाहू शकतो, यात उंट हळूहळू पाण्याच्या दिशेने जाताना दिसतो. त्याच्याकडे पाहूनच त्याला किती आनंद झाला आहे स्पष्ट समजते. उंट पाण्याच्या किनारी बसतो आणि त्याचवेळी लाटा येतात ज्यामुळे तो पूर्णपणे पाण्याखाली जातो मात्र तरीही तो तिथून उठत नाही आणि पाण्याच्या मनसोक्त आनंद उचलू लागतो. त्याचा आनंद आता युजर्सनाही सुखावून जात आहे. उंटाचा हा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा इंटरनेटवर पसरत आहे, लोक यातील दृश्ये पाहून चांगलीच खुश झाली असून मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला शेअर केले जात आहे.
पांचट Jokes : मुलीची आवड की आईचा स्वार्थीपणा? वाचाल तर हसून हसून जमिनीवर लोटपोट व्हाल
उंटाचा हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगल्या व्युज मिळाल्या असून पाहिले असून अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उंटांना पाण्याशिवाय महिनोनमहिने जगता येते पण तरीही त्यांना त्याचे मूल्य सहज कळते. समुद्रात एक खेळ पाहणे हे एक आठवण करून देते की दुष्काळापासून वाचणारे सर्वात प्राणी देखील समुद्रासाठी आसुसलेले असतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कदाचित हेच त्याच्यासाठी स्वर्ग आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.