जियेंगे साथ मै और मरेंगे...! जोडीदाराच्या मृत्यूने असा बिथरला की चोचीने करू लागला उठवण्याची विनवणी; हंसाचा हृदयद्रावक Video Viral
जगात प्रेमा इतकं सुंदर आणि घट्ट नातं कोणतंही नसतं असं म्हटलं जात. प्रेमाने अनेक गोष्टी जिंकता येतात पण जेव्हा प्रेमचं हरवतं तेव्हा सर्वच गोष्टी आपल्यापासून दूर गेल्यासारखे वाटू लागते. आपली आवडती व्यक्ती आपल्यापासून दूर झाल्याचे दुःख जगातील सर्वात वाईट दुःख आहे. प्रेमळ व्यक्तीला निरोप द्यायचा झाला की आपल्या डोळ्यातून टचकन पाणी येते. ही भावना आणि हे दुःख तुम्हीही कधी अनुभवले असेलच पण तुम्हाला माहिती आहे का? याच भावना प्राण्यांमध्येही तुडुंब भरलेल्या असतात. आपली प्रेमळ व्यक्ती सोडून गेल्याच दुःख फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही तितकंच होत आणि हेच पटवून देणारा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एका तळ्यात दोन हंस पोहत असल्याचे दिसते पण पुढच्याच क्षणी आपल्याला समजते की, यातील एक हंस मृत्युमुखी पावला आहे आणि त्याचा जोडीदार त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मृत्यू पावलेल्या हंसाचं डोकं पाण्यात बुडालेलं असत आणि त्याचा जोडीदार त्याच डोकं पाण्याबाहेर उचलून त्याला पुन्हा पुन्हा जागे करण्याचा प्रयत्न करत असतो. आपला जोडीदार पुन्हा जिवंत व्हावा म्हणून हंस धडपडत असतो पण शेवटी त्याचा काहीच उपयोग होत नाही. हंसाने कितीही प्रयत्न केला तरी त्याचा जोडीदार मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होऊ शकत नाही. आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला आहे ही भावनाच मुळात त्याला पटत नाही आणि म्हणूनच तो त्याला पुन्हा पुन्हा जागे करण्याचा प्रयत्न करत असतो. हंसाची ही अवस्था आणि त्याचे दुःख आता सोशल मीडियावर युजर्सना भावुक करत आहे. लोकांना हंसाचे दुःख जिव्हारी लागले इंटरनेटवर वेगाने हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
A love that even death can’t break🩷
This swan tries desperately to wake its lifeless partner — a soulmate it chose for life.
Swans mate for life, and when one is gone… the other feels it deeply.Some bonds are forever. pic.twitter.com/ykdxT3JECJ
— Susanta Nanda IFS (Retd) (@susantananda3) August 6, 2025
हा भावनिक व्हिडिओ @susantananda3 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जोडीदाराचे निधन हृदयद्रावक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानव त्या वेदना समजू शकतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे. किती निष्ठा आणि किती दुःख”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.