
फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, "याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले"
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या अनोख्या व्हिडिओने क्षणातच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लोकांनी तर व्यक्तीला स्पायडरमॅनचीही उपमाही दिली. व्हिडिओत पाहिल्यास यात स्पष्ट दिसून दिसते की एक फिटनेस प्रेमी मुलगा घराच्या छतावरून काळजीपूर्वक खाली उतरत आहे. तो घराच्या बाहेरील बाजूस एका पालीप्रमाणे चिपकतो आणि एकामागून एक पुश अप्स करू लागतो. मुलाचा हा पराक्रम त्याच्यासाठी सामान्य असले तरी पाहणाऱ्यांना मात्र हे दृश्य पाहून धडकी भरते. मुलगा खाली पडेल की काय या विचाराने सर्वांचा श्वास क्षणभरासाठी थांबतो पण सुदैवाने त्याचा हा स्टंट शेवटपर्यंत यशस्वी होतो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला मुलगा पुश अप्स करताना दिसतो आणि इथेच व्हिडिओला शेवट होतो. आपला जीव धोक्यात घालून केलेला हा स्टंट लक्ष वेधून घेणारा असला तरी यातील धोका मात्र अनेक पटींनी जास्त आहे, मुलाची एक चूक त्याचा जीव घेऊ शकली असते. व्युज मिळवण्यासाठी लोक निरनिराळे स्टंट्स करू पाहत आहेत पण असं करताना आपल्या जीवाची आणि सुरक्षेचीही तितकीच काळजी घ्यायला हवी.
India Is Not For Beginners 🇮🇳 pic.twitter.com/4MLnZS1Oyc — Rosy (@rose_k01) December 28, 2025
हा व्हिडिओ @faz3 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सर्वाेत्तम बाबा, प्रत्येक मुलीला असे वडिल मिळायला हवेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी कधीही रील्सवर कमेंट करत नाही, पण हे पाहिल्यानंतर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. याला म्हणतात बाबा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काकांना सलाम, देव त्यांना आणि त्यांच्या मुलीला आशीर्वाद देवो ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.