पाण्याचा राक्षस आणि अजगर आले आमने-सामने; दोघांनीही शरीर ओरबाडून खाल्ले पण शेवट मात्र आश्चर्यकारक ठरला; Video Viral
सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतात. इथे माणसांचेच काय तर प्राण्यांचीही अनेक व्हिडिओज शेअर केले जातात ज्यात त्यांच्या शिकारीचे दृश्ये दिसून येतात. आताही इथे एका थरारक शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमचा थरकाप उडवू शकतात. मुळातच जंगलातले आयुष्य हे फार वेगळे आणि संघर्षाने भरलेले असते. इथे एकाला जगायचे तर दुसऱ्याचा मृत्यू होणे अटळ सत्य आहे. अशातच आता मगर आणि अजगरमधील एक भयंकर लढाई सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मगर, अजगर दोघेही जंगलातील धोकादायक शिकारी असल्याकारणाने दोघांमधील ही लढाई कोणते वळण घेते आणि यात कोण विजयी ठरतं हे पाहणं फार मजेदार ठरतं.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात सुरुवातीला पाण्यात मगर पोहताना दिसतो. त्याची नजर समोरच्या दिशेला असते आणि तो आपल्या शिकाऱ्याकडे एकटक नजरेने पाहत असतो. पुढच्याच क्षणी पाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अजगर दिसू लागतो ज्याच्यावर मगरीने निशाणा साधलेला असतो. मगर अजगराला सोपा शिकार समजून त्याच्यावर हल्ला करतो. तो त्याच्या शक्तिशाली जबड्याने अजगराचे तोंड पकडतो. पण त्याची ही चूक त्याला महागात पडते. अजगर लगेचच प्रत्युत्तर देतो आणि मगरीला त्याच्या लांब शरीराने गुंडाळायला सुरुवात करतो. काही वेळातच अजगर मगरीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवतो. सर्व प्रयत्न करूनही, मगरी अजगरापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही आणि त्याच्या विळखयता तो वाईटरित्या अडकला जातो. हळूहळू अजगर आपली पकड ढिली करतो आणि मगरीला आपली चूक लक्षात येते. व्हिडिओच्या शेवटी मगर अजगराला घाबरून दुसऱ्या दिशेला पाळताना दिसून येतो, तर अजगरही तिथून निघून जातो. दोन्ही शिकाऱ्यांमध्ये रंगलेली ही शिकार काही क्षणातच संपते आणि दोघेही एकमेकांना त्यांच्या परिस्थतीवर सोडून तिथून निघून जातात.
अटी-तटाचे हे युद्ध युजर्सचे मात्र चांगलेच मनोरंजन करते ज्यामुळे कमी वेळेतच याला चांगले व्युज मिळतात. हा व्हायरल व्हिडिओ @ojatro नावाच्या युट्युब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजगर म्हणत असेल तू मला चिमटा काढला थांब तुला मिठी मारतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लहान मगर म्हणत असेल मला लढायचं आहे आणि अजगर म्हणाला, असेल तू लहान आहेस मित्रा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.