(फोटो सौजन्य: X)
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. आपली आई आपल्यासाठी सर्वस्व असते. आईमध्ये कितीही करुणा आणि ममता भरली असली तरी वेळ आली तर ती संपूर्ण जगासोबत आपल्या मुलासाठी लढू शकते. आई-मुलाचं नातं या जगातील सर्वात सुंदर आणि वेगळं नातं असतं. आपले आई वडीलच असतात जे आपल्यावर निस्वार्थी प्रेम करतात. आई मुलाच्या नात्यातही असंच प्रेम दिसन येत. जंगलातील आयुष्य हे फार वेगळे असते, इथे जीवन मरणासाठी संघर्ष करावा लागतो अशात आई आपल्या पिल्लांचे त्यांच्या जन्मापासूनच रक्षण करू लागतात. पण अनेकदा असेही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत ज्यात आईने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी बड्या शिकाऱ्याच्या जबड्यात आपला प्राण गमावला आहे. हे धाडस फक्त एक आईच आपल्या मुलासाठी करू शकते.
त्यातच आता सोशल मीडियावर माणुसकीचे दर्शन घडवणारे एक सुंदर दृश्य व्हायरल झाले आहे ज्यात एका व्यक्तीने हरवलेल्या हरणाच्या पिल्लाची आपल्या आईशी भेट करून दिल्याचे दिसून आले. अनेकदा जंगलातून पिल्ले आपल्या आईपासून वेगळी होतात आणि हरवतात आणि बराच शोध घेऊनही आईला त्यांना शोधता येत नाही. असेच काहीसे एका हरणाच्या पिल्लासोबत घडले, जो त्याच्या आईपासून वेगळा झाल्यानंतर जंगलात हरवला. आईने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हरवलेल्या हरणाला वाचवून त्याच्या आईकडे परत घेऊन जात असल्याचे दिसते. पिल्लू त्याला जमिनीवर ठेवताच आधी व्यक्तीकडे पाहू लागतो तर दुरूनच आई आपल्या पिल्लाला पाहून आनंदित झाली असते. ती हळूहळू पुढे आणि व्यक्ती तिच्या पिल्लाला उचलून त्याच्याकडे आईजवळ त्याला ठेवून देतो. आई हे सर्वच पाहते आणि यावेळी तिचे डोळे कृतज्ञेने भरल्याचे दिसून येते जाणून ती व्यक्तीचे मनापासून आभार मानत आहे.
The way mother looking at guy 🥺❤️🩹pic.twitter.com/nL2oBcdHUR
— Interesting things (@awkwardgoogle) July 29, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @awkwardgoogle नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती सुंदर दृश्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने पिल्लाला स्पर्श करायला नको होता. ती कदाचित पिल्लाला मारू शकते किंवा सोडून देऊ शकते. प्राण्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांचे तुकडे करताना पाहिले आहे कारण तुम्ही त्यांना दयाळूपणे स्पर्श केला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.